सुख (Happiness), समृद्धी, खुशहाली आणि संपन्नता म्हणून लाफिंग बुद्धाच्या (Laughing Buddha)मूर्तीकडे पाहिलं जातं. असं म्हणतात कि लाफिंग बुद्धा ची मूर्ती घरात ठेवली तर घरात पैशाची (Money) कमी नसते. तुम्ही घर, ऑफिस, रेस्टोरंट अशा अनेक ठिकाणी ही मूर्ती बघितली असेल. आपण अशा अनेक ठिकाणी लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेऊ शकतो पण अशा काही ठराविक जागा आहेत जिथे ही मूर्ती ठेऊ नये असं म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात नेमकी कशी ठेवली पाहिजे आणि ती कुठे ठेऊ नये.
वास्तू शास्त्रानुसार, लाफिंग बुद्धाची मूर्ती मुख्य दरवाज्यासमोर कमीत कमी ३० इंच वर ठेवायला हवी. ही मूर्ती 30 इंच ते 32.5 इंच या दरम्यानच्या उंचीवर ठेवली गेली पाहिजे, 32.5 पेक्षा जास्त उंचीवर ती नसावी. याशिवाय तुम्ही ही लाफिंग बुद्धाची मूर्ती पूर्व दिशेला ठेऊ शकता. या जागेला कुटुंबाचं सौभाग्य स्थान म्हटलं जातं.
प्रयत्न करा की लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचं तोंड हे मुख्य दरवाजाच्या बरोबर समोर असेल जेणेकरून घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला लाफिंग बुद्धाची हसणारी मुद्रा दिसेल. असं केल्यास घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची नकारात्मकता नष्ट होते. लाफिंग बुद्धाची मूर्ती मुलांच्या स्टडी टेबलवर ठेवली तर मुलांची एकाग्रता वाढते, याचा एकूणच चांगला परिणाम होतो.
वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या लाफिंग बुद्धाच्या मूर्तीचं नाक घर मालकाच्या हाताच्या एका बोटाइतकं असावं. लाफिंग बुद्धाच्या मूर्तीची उंची घर मालकिणीच्या हाता इतकी असावी. घरात जर अशा प्रकारची लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात असेल तर अशी मूर्ती माणसाला कधी कंगाल होऊ देत नाही.
घरातल्या काही ठिकाणी लाफिंग बुद्धा ची मूर्ती ठेवल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. वास्तु शास्त्रानुसार किचन, डायनिंग एरिया, बेडरूम मध्ये, टॉयलेट बाथरूमच्या आसपास कधीच लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेऊ नये. या मूर्तीला कधीच जमिनीवर ठेऊ नये. ही मूर्ती तुम्ही टेबलवर ठेऊ शकता.
इतर बातम्या :