IIT मुंबईतून इंजीनियरिंग, महाकुंभ 2025 मध्ये चर्चेतील साधू…कोट्यवधींचे पॅकेज सोडून का बनले संन्याशी?

| Updated on: Jan 16, 2025 | 1:39 PM

Mahakumbh 2025: मनाला शांती मिळाली आहे. हा चमत्कारीक संसार आहे. आम्ही संगमात डुबकी लावून मनाच्या शांतीचा शोध घेत आहे. यापूर्वी अनेक धार्मिक शहरांचा प्रवास केला आहे. यानंतर अध्यात्मिक प्रवास सुरु राहणार आहे. जीवनात चरमोत्कर्ष बिंदू ईश्वरची प्राप्ती आहे.

IIT मुंबईतून इंजीनियरिंग, महाकुंभ 2025 मध्ये चर्चेतील साधू...कोट्यवधींचे पॅकेज सोडून का बनले संन्याशी?
इंजीनियर बाबा अभय सिंह
Follow us on

Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये सुरु झालेला महाकुंभ 2025 मध्ये अनेक साधू-महंत आले आहेत. त्यातील काही जण माध्यमांचे आकर्षणाचे केंद्र बनत आहे. त्यात आयआयटी मुंबईतून एयरोस्पेस इंजीनियरींग करणारे इंजीनियर बाबा म्हणजेच अभय सिंह आहेत. त्यांची कहाणी चांगलीच व्हायरल झाली आहे. इंजीनिअरींगनंतर मिळालेले कोट्यवधींचे पॅकेज सोडून ते साधू बनले आहे. सोशल मीडियावर त्यांची मुलाखत ट्रेडींगमध्ये आली आहे.

हरियाणामधील इंजीनियरिंग बाबा

हरियाणामधील इंजीनियर बाबा म्हणजेच अभय सिंह यांनी आयआईटी बॉम्बेमधून 2014 च्या बॅचमध्ये एयरोस्पेस इंजीनियरिंग केले. इंस्टग्रामवर त्यांची इंजीनियरिंगच्या दिवसातील फोटो आहेत. तसेच दीक्षांत समारंभात पदवी घेतानाचा फोटो आहे. पदवी घेतल्यानंतर त्यांना कोट्यवधीच्या पॅकेजची नोकरी मिळाली. परंतु नोकरीत मन लागले नाही. त्यामुळे ट्रॅव्हल फोटोग्रॉफीचा कोर्स केला. फोटोग्रॉफीत करियर करायचे होते. फोटोग्रॉफीचा कोर्स करताना जीवनासंदर्भातील त्यांचा दृष्टीकोन बदलू लागला. त्यावेळी त्यांनी कोचिंग सेंटर उघडून फिजिक्स शिकवणे सुरु केले. परंतु अचानक त्यांचा कल अध्यात्माकडे आला. ते म्हणतात, मी माझे जीवन भगवना शंकरांकडे समर्पित केले.

सर्व काही शिव

इंजीनियर बाबा म्हणतात, मी सायन्सच्या माध्यमातून अध्यात्म समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अध्यात्मात मजा येत आहे. त्याच्या गंभीरतेकडे मी जात आहे. सर्व काही शिव आहे. सत्यच शिव आहे. शिवच सुंदर आहे. मी जीवनातील सर्वात सुंदर टप्प्यावर आहे. तुम्ही ज्ञानाच्या शोधात असाल तर या ठिकाणी विराम बिंदू मिळेल.

हे सुद्धा वाचा

महाकुंभ 2025 मध्ये आल्यावर इंजीनियर बाबा म्हणतात, मनाला शांती मिळाली आहे. हा चमत्कारीक संसार आहे. आम्ही संगमात डुबकी लावून मनाच्या शांतीचा शोध घेत आहे. यापूर्वी अनेक धार्मिक शहरांचा प्रवास केला आहे. यानंतर अध्यात्मिक प्रवास सुरु राहणार आहे. जीवनात चरमोत्कर्ष बिंदू ईश्वरची प्राप्ती आहे. त्याचे माध्यम संन्यासमधून जाते.

इंजीनियर बाबाचे इंस्टावर पोस्ट अनेक पोस्ट ध्यान, योग, सूत्र, कालचक्र यासंदर्भात आहे. त्यांच्या एका पुस्तकाची लिंक यामध्ये दिली आहे. एका पोस्टमध्ये डोळ्याचे तंत्र सांगताना विशिष्ट पद्धतीने उर्जा आणि शक्ती बनवण्याचे सांगत आहे. ते म्हणतात, काय पाहायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे.