Maha Kumbh Mela 2025: जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु झाला आहे. हा उत्सव म्हणजे महाकुंभ आहे. प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होत आहे. आजच्या पिढीने कुंभमेळा पहिला आहे. परंतु महाकुंभ पाहिला नाही. प्रयागराजमध्ये येणारा या कुंभ मेळाव्यास महाकुंभ का म्हटले जात आहे? कारण महाकुंभ 144 वर्षांतून एकवेळेस आला आहे. यंदा तो 2025 मध्ये आला आहे. ज्या चार ठिकाणी कुंभ मेळा होतात, त्यापैकी प्रयागराजमध्येच महाकुंभ येतो. प्रयागराजमध्ये 11 कुंभमेळा झाल्यानंतर जेव्हा 12 वा कुंभमेळा येतो, तेव्हा त्या मेळाव्यास महाकुंभ म्हटले जाते. कुंभ मेळा किंवा महाकुंभात पहिला स्नानचा अधिकार नागा साधूंना असतो. कसे बनतात नागा साधू?, नागा साधू बनण्याची साधना किती आहे कठीण?, महिला नागा साधू कशा बनतातत? कुंभ मेळा झाल्यानंतर नागा साधू कुठे जातात? नागा साधू काय खातात? कुंभ मेळाचा धार्मिक परंपरा समजून घेत या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
कुंभ मेळा दर तीन वर्षांनी नाशिक (गोदावरी), हरिद्वार (गंगा), उज्जैन (शिप्रा) आणि प्रयागराज (गंग-यमुना-सरस्वती) या ठिकाणी होतो. प्रत्येक एका ठिकाणी दर तीन वर्षांनी कुंभ होतो. म्हणजेच प्रत्येक 12 वर्षांनी पुन्हा त्याच ठिकाणी कुंभमेळा होता. प्रयागराजमध्ये 11 कुंभ पूर्ण झाल्यानंतर 12 कुंभ मेळा जेव्हा येतो तो महाकुंभ असतो. या महाकुंभाला कुंभापेक्षाही जास्त धार्मिक महत्व आहे. त्यामुळे या महाकुंभास जगभरातून विक्रमी संख्येने भाविक येणार आहेत.
कुंभ मेळा ही खूप जुनी परंपरा आहे. परंतु तिला मोठ्या उत्सवाचे रुप देण्याचे श्रेय आदि शंकराचार्यांना आहे. यासंदर्भात धार्मिक ग्रंथात एक कथा आहे. त्यानुसार, एकवेळेस देवता-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले. त्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. त्यात देवी लक्ष्मी, ऐरावत हाथी, अप्सरा, कल्पवृक्ष आणि कामधेनू गाय आदी प्रमुख होते. सर्वात शेवटी भगवान धनवंतरी अमृत कलश घेऊन आले. मग हा अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि दैत्य यांच्यात युद्ध झाले. हे युद्ध 12 दिवस सुरु असलेल्या युद्धात प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नासिकमध्ये अमृत कलशची काही थेंब पडली. त्यामुळे या चारही ठिकाणी कुंभ मेळा होतो.
1700 वर्षांपूर्वी भारतातील सिंध प्रांतात मुस्लीम आक्रमणकारी मुहम्मद बिन कासिम याने आक्रमण केले. त्यावेळी भारतात एका संताचा उदय झाला. ते आदि गुरु शंकराचार्य आहे. सनातन धर्माला विविध आक्रमणापासून वाचवण्यासाठी त्यांनी संपूर्ण देशात भ्रमण करत चार मठांची स्थापना केली. त्यांनी साधूंची आर्मीच तयार केली. त्या आर्मीतील साधू शस्त्र आणि शास्त्रांनी सिद्ध असले पाहिजे. तेच नागा साधू आहे. नागा साधू लढवय्ये आहे, त्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. जेव्हा अफगाण आक्रमणकारी अहमद शाह अब्दाली याने मथुरा-वृदांवन आणि गोकुळवर आक्रमण केले, तेव्हा चार हजार नागा साधूंनी 30 हजार मुस्लीम अफगाणी सेनेचा पराभव केला. या नागा साधूंचा उद्देश सनातन धर्म टिकवून ठेवणे हाच आहे, असे प्रयागराजमधील इलाहाबाद विद्यापीठातील प्रोफेसर योगेश्वर तिवारी यांनी सांगितले.
डॉ. योगेश्वर तिवारी यांच्यानुसार, नागा साधूंचा इतिहास अजब आहे. ते हिमालयातील पहाड, गुफांमध्ये राहतात. जेव्हा कुंभ मेळा असतो किंवा माघ मेळा असतो तेव्हा नागा साधू बाहेर येतात. संपूर्ण अंगावर राख लावलेले हे साधू ईश्वर आणि अध्यात्म यावर चर्चा करतात. 12 वर्षे कठोर तपस्या करतात. त्यानंतर कुंभ मेळ्यात त्यांना श्वेत वस्त्र दिली जातात. मग तीन दिवस गायत्री मंत्राचे जप केले जाते. त्यानंतर त्यांचा मुंडन संस्कार होतो. त्या दरम्यान त्यांचा श्राद्ध आणि पिंडदान होते. पिंडदानच्या दिवशी आचार्य महामंडलेश्वर त्यांना नागा होण्याची दीक्षा देतात. त्यानंतर ते कुंभ स्नानाचे अधिकारी होतात.
साधूंच्या नागा वर्गात सामील झालेल्या साधूंचे सात प्रमुख शैव आखाडे आहे. त्यांना नागा म्हणतात. त्यामध्ये ‘बडा उदासीन आखाडा’ आहे, त्यांना ‘तंगतोडा साधू’ म्हणतात. तंगतोडा साधू आखाड्याच्या मुख्य संघात आहेत आणि आखाड्याच्या परंपरा पुढे नेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तंगतोडा साधू निवडीची प्रक्रिया संघ लोक सेवा आयोगाच्या आयएएस परीक्षेपेक्षाही कठीण आहे. या मुलाखतीत साधारण व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. बडा उदासीन आखाडेचे देशभरात पाच हजार आश्रम, मठ अन् मंदिर आहे. नागा साधूपेक्षा हे वेगळे आणि कठीण आहे. तंगतोडा बनवण्यासाठी निवड झालेल्या चेल्यांना रमता मंचसमोर सादर केले जाते. रमता मंच इंटरव्हू बोर्डाचे काम करतो. त्यांच्याकडून साधूंची कठोर परीक्षा घेतात. IAS पेक्षा कठीण प्रश्न या मुलाखतीत विचारले जातात. त्याची उत्तर कोणत्याही पुस्तकात नसतात. त्यातून त्यांचे अध्यात्मिक ज्ञान, अखाड्याची परंपरा, सेवा भाव समजून घेतला जातो.
तंगतोडा साधुसाठी आलेल्या चेल्यांना अनेक दिवस धुनासमोर एका लंगोटीत मोकळ्या आकाशाखाली ठेवले जाते. त्यांना सतत 24 तास धुराच्या संपर्कात राहावे लागते. या प्रक्रियेचा उद्देश साधू कठीण प्रसंगांना तोंड देण्यास सक्षम आहे याची खात्री करणे हा आहे. तंगतोडा साधू बनवण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक साधूला यश मिळत नाही. सहभागी झालेल्या चेल्यांमधून एक डझन चेलेच तंगतोडा साधू बनतात. मग ते आखाड्याच्या कोर टीमचा हिस्सा बनतात. धार्मिक कार्यक्रम आणि परंपरा आयोजित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच आखाड्याच्या परंपरा पुढे नेण्याचे काम करा.
नागा साधू कंद, मुळे, फळे, फुले खातात. कुंभकाळात ते एकदाच भोजन करतात. त्यांच्या अंगावर एकही कपडा नसतो. संपूर्ण अंगावर राख लावलेली असते. या साधूंचे चार पीठ आहे. त्यात ज्योतिष्पीठ बदरिकाश्रम, श्रृंगेरी पीठ, द्वारिका शारदा पीठ आणि पुरी गोवर्धन पीठ आहे. त्यातील प्रमुखाला शंकराचार्य म्हटले जाते.
नागा साधूंचा जिवंतपणी श्रद्ध झालेला असतो. त्यामुळे त्यांचा मृत्यूनंतर अंतिम संस्कार केला जात नाही. त्यांचा मृतदेह सरळ गंगा नदीत प्रवाहित केले जाते किंवा त्यांची समाधी बनवली जाते. मोक्ष प्राप्ती त्यांचे परम लक्ष्य असते.
नागा साधू दिगंबर असतात. परंतु महिला जेव्हा संन्यास घेतात तेव्हा त्यांना नागा बनवण्याची दीक्षा दिली जाते. त्या महिला कपडे परिधान करतात. त्यांना फक्त भगव्या रंगाचे कपडे परिधान करण्याची संमती असते. ते कपडे शिवलेले नसतात. महिला नागा साधू बनण्यापूर्वी त्यांना सहा ते बारा वर्षे ब्रह्मचार्याचे पालन करावे लागते. त्यानंतर त्यांना नागा साधू बनवण्याची परवानगी दिली जाते. महिला नागा आपल्या डोक्यावर टीळा लावतात. महिला नागा साधूंना जीवंतपणी स्वत:चे पिंडदान करावे लागते. त्यांना संन्यासी करण्याची प्रक्रिया सर्वोच्च पदाधिकारी आचार्य महामंडलेश्वर पूर्ण करतात.