मुंबई : महाशिवरात्रीला (MahaShivratri) अत्यंत मोठे महत्व आहे. प्रत्येक महिन्याची चतुर्दशी तिथी भगवान शिवाला (Lord Shiv) समर्पित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवला प्रसन्न करण्यासाठी भाविक पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पूजा करतात. या वर्षी महाशिवरात्री 1 मार्च रोजी साजरी (Celebration) केली जाणार आहे. या पवित्र दिवशी रुद्राभिषेक केल्यास मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच शिवलिंगावर विशेष गोष्टी अर्पण केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात. अशा स्थितीत महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत, हे देखील आपण बघणार आहोत.
महाशिवरात्रीला शिवलिंगावर या गोष्टी अर्पण नकी करू
भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कधीही शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नयेत. तसेच पॅकेट दूध देखील अर्पण करू नये, शक्यतो थंड दूधच परमेश्वराला अर्पण करावे. यासोबतच भगवान शंकराला चुकूनही चंपाचे फुल अर्पण करू नये. तांदूळाचा चुरा कधीही शिवलिंगाला अर्पण करू नये, तसेच तुटलेली बेलाची पानेही अर्पण करू नयेत. शिवलिंगावर कुंकाचा गंध कधीच लावू नका.
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त
यावेळी महाशिवरात्रीची शुभ तिथी मंगळवार, 1 मार्च 2022 रोजी पहाटे 3.16 पासून सुरू होत आहे. तर चतुर्दशी तिथीची समाप्ती बुधवार, 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे, म्हणजेच महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा 1 मार्च रोजीच होणार आहे.
महाशिवरात्रीला अभिषेक कसा करावा
धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावर नेहमी पंचामृत अर्पण करावे. दूध, गंगाजल, केशर, मध आणि पाणी यांचे मिश्रण पंचामृत म्हणतात. महाशिवरात्रीला जो कोणी चार प्रहारांची पूजा करतो आणि भोलेनाथ त्यांना पहिल्या प्रहारात पाण्याने, दुसऱ्या प्रहारात दही, तिसऱ्या प्रहारात तूप आणि चौथ्या प्रहारात मधाने अभिषेक करतो, परमेश्वर त्यांचे सर्व दुःख दूर करतो. या दिवशी भक्तांनीही पूर्ण भक्तिभावाने व्रत पाळावे आणि चारही प्रहारांची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून उपवास सोडावा.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधित बातम्या :
Zodiac Signs | या 4 राशींचे भाग्य बदलेल, फक्त संयम ठेवा नशीब उजळेल!