Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी देवांचे देव महादेव यांची पूजा केली जाते. पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी साजरी होणार आहे. या दिवशी अतिशय शुभ योगायोग आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धी योग आणि धनिष्ठा नक्षत्र यांचा अप्रतिम संगम तयार होत आहे. ज्याच्या शुभ प्रभावामुळे ८ मार्चपासून काही राशींचे भाग्य उजळणार आहे. भोलेनाथाच्या कृपेने जीवनातील सर्व समस्या दूर होतील. चला जाणून घेऊया महाशिवरात्रीला कोणत्या राशींचे शुभ दिवस सुरु होणार आहेत.
मेष : नोकरी, व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आनंदी जीवन जगाल.
वृषभ : जमीन किंवा वाहन खरेदीचे योग येतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील. प्रदीर्घ प्रलंबित कामे सुरू होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. भौतिक सुखसोयींमध्ये जीवन जगेल.
कन्या : तुम्ही करत असलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम होतील. कौटुंबिक जीवन आनंदाने व्यतित कराल. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशाची आवक वाढेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील.
मकर : व्यवसायात किंवा कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. तुम्ही करत असलेल्या कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये बढती किंवा मूल्यांकन मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मानसिक ताण कमी होईल.