मुंबई : नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे ‘मकर संक्रांत’. दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांतील हिंदू धर्मात विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर केलेले दान करणे फलदायी असते, असे सांगितले जाते. या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे.
मकर संक्रांतीशी संबंधित अनेक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जरी अशा काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी करू नयेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
मकर संक्रांतीला तुम्ही काय करू शकता
या दिवशी नदीत आंघोळ करणे शुभ मानले जात असले तरी ते शक्य नसेल तर घरात काळे तीळ पाण्यात टाकून स्नान करू शकता.
या सणाला शनिदेवाला प्रसन्न करणे खूप शुभ मानले जाते. काळे तीळ दान करून तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता.
या दिवशी तीळ टाकून पाणी प्या. तसेच तिळाचे लाडू खाणे आणि तिळाची पेस्ट लावणे खूप शुभ मानले जाते.
मकर संक्रांतीला खिचडी खाणे देखील खूप शुभ आहे. उपवासानंतर प्रसाद म्हणून खिचडी खातात.
काय करू नये
या दिवशी दानधर्माला विशेष मान्यता आहे. तुमच्या घरी एखादा गरीब काही मागायला आला तर त्याला चुकूनही रिकाम्या हाताने पाठवू नका.
हिंदू धर्मात हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहावे. दारू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन अशुभ आहे.
जरी उपवास ठेवणारे प्रत्येक नियम पाळतात, परंतु जे उपवास करत नाहीत आणि उपासनेवर विश्वास ठेवतात त्यांनाही काही नियम पाळावे लागतात. आंघोळ आणि पूजा करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारे अन्न सेवन करू नये.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा
तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…
Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की