मुंबई | 13 जानेवारी 2023 : यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. देशभर साजरा होणाऱ्या उत्सवांपैकी मकर संक्राती हा एक मोठा उत्सव आहे. देशभरात या उत्सवाची धूम असते. या दिवशी पतंग उडवून आनंद साजरा केला जातो. लहानांपासून वृद्धांपासून सर्वचजण पतंग उडवण्याचा आनंद लुटत असतात. तरुणीही आणि गृहिणीही पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात. याच दिवशी एकमेंकाना तिळगुळ देऊन नात्यात गोडवा निर्माण केला जात असतो. त्यासाठी एकमेकांना तीळगुळ भरवला जात असतो. या दिवशी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात असतात. आम्हीही तुम्हाला असेच पाच शुभेच्छा संदेश घेऊन आलोय. तुमच्या मित्रमंडळींना नक्की पाठवा.
मकर संक्रातीच्या दिवशी सूर्याचे मकर राशीत परिवर्तन होत असते. या स्थितीलाच मकर संक्रांती म्हणून ओळखले जाते. तसेच याच दिवशी सूर्य उत्तरेकडे वळतो, त्यामुळे त्याला उत्तरायणही म्हटलं जातं. मकर संक्रांती साधारण हिवाळ्यात येते. पण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून उन्हाळ्यास सुरुवात होते. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू दिले जातात. तिळ आणि गुळ मिळून हे लाडू तयार केलेले असतात. हे लाडू खालल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते.
म… मराठमोळा सण
क… कणखर बाणा
र … रंगीबिरंगी तिळगुळ
सं… संगीतमय वातावरण
क्रा… क्रांतीची मशाल…
त …तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
—————–
एक तिळ रुसला, फुगला,
रडत रडत गुळाच्या पाकात पडला,
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
—————–
तिळाची गोडी, प्रेमाची माडी,
माडीचा जिना, प्रेमाच्या खूणा, मायेचा पान्हा,
साऱ्यांच्या मना, म्हणूनच एक तीळ सात जना,
मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
——————-
तुमचे आयुष्य सूर्याच्या किरणांप्रमाणेच,
सुखाने आणि भरभराटीने भरून जावो,
मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.
————————–
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!