मकर संक्रांतीला स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व, जाणून घ्या स्नान आणि दानाचा मुहूर्त

| Updated on: Jan 13, 2025 | 7:15 PM

मकर संक्रांतीच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पूर्ण वर्षानंतर सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊ मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्याचा मुहूर्त आणि दान करण्याचे महत्त्व

मकर संक्रांतीला स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व, जाणून घ्या स्नान आणि दानाचा मुहूर्त
Follow us on

मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू धर्मामध्ये दान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने कित्येक पटीने जास्त पुण्य प्राप्त होते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशि प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून ऋतू देखील बदलू लागतात. या दिवसाच्या अनेक धार्मिक मान्यता आहे. तसेच या दिवशी दानधर्म करण्यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जाणून घेऊ मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याची शुभ वेळ आणि महत्त्व

मकर संक्रांत तारीख आणि मुहूर्त

14 जानेवारी रोजी सकाळी 8: 55 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे त्यादिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असेल. यामध्ये सकाळी 8:55 मिनिटांपर्यंत ते दुपारी 12:51 पर्यंतचा शुभ काळ राहील. तर 8:55 ते 9:29 ही वेळ महापुण्यकाळ असेल. यावेळी अमृत काळ असल्याने दान केल्यास उत्तम फळ मिळते.

हे सुद्धा वाचा

14 जानेवारी ब्रह्म मुहूर्त पहाटे 5.27 ते 6.21 पर्यंत आहे. तर अमृत कालचा शुभ मुहूर्त सकाळी 7:55 ते 9:29 पर्यंत आहे.

मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचे महत्त्व

मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी गंगा स्नान केल्याने आणि दान केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच या दिवशी उत्तरायणात सूर्यदेव मकर राशीतून उत्तर दिशेला येतात त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण असेही म्हणतात. या दिवशी सूर्य देवासह भगवान विष्णूची ही पूजा केली जाते. या दिवशी दान केल्याने माणसाची सर्वे पापे नष्ट होतात. तसेच या दिवशी गरीब, कष्टकरी आणि गरजू लोकांना गुळ, रेवडी, शेंगदाणे इत्यादीचे दान करण्याला विशेष महत्त्व आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)