मुंबई : मंगळाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं. एखाद्याचं लग्न जमवायचं असेल तर कुंडलीत मंगळ आहे की नाही हे आवर्जून पाहिलं जातं. जर मंगळ शुभ स्थितीत असेल तर जीवन मंगलमय होतं आणि अशुभ स्थितीत असेल तर आयुष्याची वाट लागू शकते अशी धारणा आहे. त्यातल्या त्यात मंगळाचा वैवाहिक जीवन, प्रेम संबंधावर परिणाम पडतो, असं मानलं जातं. मंगळ अशुभ स्थितीत असेल तर नवरा बायकोमध्ये भांडणं होऊ शकतात. कारण मंगळ हा उग्र ग्रह मानला जातो. अशा स्थितीत अनेक वेळा घटस्फोटही होतात. (mangal planet in kudali Spoil the relationship Create Divorce Situation)
ज्योतिषांनुसार, कुंडलीत 1, 4, 7, 12 ह्या स्थानांवर मंगळ असेल तर तो मंगळ दोष मानला जातो. अशा लोकांना मांगळीक म्हटलं जातं. मंगळाची अशुभ स्थिती स्वभाव रागीट करते. अशा स्थितीत व्यक्तीचा आत्मविश्वास कमजोर होतो. एवढच नाही तर वैवाहिक जीवनात संकटं येऊन आयुष्य अस्थिर होऊ शकतं.
1.पती पत्नीत भांडणं होतात, सगळं चांगलं चाललेलं असेल तर बिघडू शकतं.
2.पती पत्नीचे संबंध हे संवेदनशिल बनतात. नातेसंबंधात रागीटपणा वाढत जातो.
3.नेहमी भांडणं होतात, त्यातुन घरात तणाव निर्माण होतो. संवाद संपतो.
4.पती पत्नीचे भांडण घटस्फोटापर्यंत जातं, अनेक वेळा कोर्ट कचेरी मागे लागते.
5. जमीन, संपत्ती, धन दौलत यावरुनही अनेक समस्या निर्माण होतात.
6. रक्तासंबंधी समस्या उदभवू शकतात.
जर कुंडलीत मंगळ ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्याला शांत करण्याचे काही उपाय आहेत. ते पाहुयात कोणते आहेत?
1. हनुमानाची पुजा करावी, त्याला वस्त्र घालावं. विवाहित महिलांनी पतीकडून हे वस्त्रं चढवावं.
2. रोज हनुमान चालिसा म्हणावी. मंगळवारी सुंदरकांडाचं पठण करावं.
3. तांब्याच्या ग्लासात पाणी प्यावं, माकडांना गुळ चने खाऊ घालावे.
(Mangal planet in kudali Spoil the relationship Create Divorce Situation)
हे ही वाचा :
या 5 राशींची लोकं बोलताना किंवा कोणतंही पाऊल उचलताना एक क्षणही विचार करत नाही!
लग्नासाठी मुलगी शोधताय?, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!