श्रावण महिना (Shravan 2022) हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिना (sawan 2022) 29 जुलैला सुरु झाला आहे. हा संपूर्ण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे. शिव भक्त दर सोमवारी श्रावण सोमवार व्रत पाळतात तर महिला दर मंगळवारी मंगळा गौरी व्रत (Mangla gauri vrat) करातात. असे मानले जाते की, माता पार्वतीने भगवान महादेवाला मिळविण्यासाठी असंख्य उपवास केले होते आणि त्यापैकी एक म्हणजे मंगळा गौरी व्रत आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. एखाद्याच्या वैवाहिक जीवनात काही संकट आले तर तेही माता पार्वतीच्या कृपेने दूर होतात. जर भक्ताची अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर हे व्रत केल्याने त्याची मनोकामनाही पूर्ण होते. यासोबतच उपवास करणाऱ्यांना माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. यंदा श्रावण महिन्यातले पहिले मंगळा गौरी व्रत 2 ऑगस्ट आणि शेवटचे मंगळा गौरी व्रत 23 ऑगस्टला असेल. यामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी भगवान शिव आणि पार्वतीची विशेष पूजा केली जाते.
मंगळा गौरी व्रत देवी पार्वती म्हणजेच गौरीच्या पूजेला समर्पित आहे. मंगला गौरी व्रत घरातील समृद्धी, उत्तम आरोग्य आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. श्रावण महिन्यात सोमवारचा उपवास भगवान शिवाला समर्पित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळा गौरीचा उपवास महादेवाची अर्धांगिनी माता पार्वतीला समर्पित केला जातो.
श्रावण महिना यावेळी 29 जुलैपासून सुरू झाला असून तो 27 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या श्रावणमध्ये चार मंगळवार आहेत.
पहिले मंगळा गौरी व्रत – 2 ऑगस्ट 2022, मंगळवार
दुसरे मंगळा गौरी व्रत – 9 ऑगस्ट 2022, मंगळवार
तिसरे मंगला गौरी व्रत – 16 ऑगस्ट 2022, मंगळवार
चौथे मंगला गौरी व्रत – 23 ऑगस्ट 2022, मंगळवार
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)