मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी एकादशीपण आली, उपवास अन् उद्यापन करावं की नाही? महिलांमध्ये संभ्रम

| Updated on: Dec 25, 2024 | 1:32 PM

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत आणि सफला एकादशी यांचा एकाच दिवशी योग येत असल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे की गुरुवार व्रताचं उद्यापन अन् एकादशीचा उपवाक किंवा व्रत हे एकत्र करावे की नाही? किंवा नक्की कोणता उपवास किंवा व्रत केलं तर चालेलं. अशा अनेक प्रश्न महिलांमध्ये आहेत. पाहुयात नक्की काय करायच आहे ते

मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी एकादशीपण आली, उपवास अन् उद्यापन करावं की नाही? महिलांमध्ये संभ्रम
Follow us on

सध्या मार्गशीर्ष महिना सुरु आहे. आणि या महिन्यात महत्त्वाचं असतं ते महालक्ष्मीचे व्रत. म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारची पुजा. पूर्ण महिनाभर हे व्रत असतं. या महिन्यातील दर गुरुवारी पूजा मांडून लक्ष्मी देवीची पूजा केली जाते, उपवास केला जातो आणि महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन असते.

गुरुवार व्रताच उद्यापन अन् एकादशी एकाच दिवशी

संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्यात येत आहे. 5 डिसेंबरला सुरु झालेले मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं. यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे 26 डिसेंबरला असणार आहे. यादिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवार व्रताच उद्यापन करुन हळदीकुंकू ठेवतात.

पण यावेळेस 26 डिसेंबरला या वर्षातील म्हणजे 2024 मधील शेवटची एकादशीही आलीये. अनेकजण हेही व्रत करतात, उपवास करतात. आणि एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे गुरुवारचं व्रत आणि त्याच उद्यापन नक्की करावं की नाही याबद्दल बऱ्याच महिलांमध्ये संभ्रम आहे.

उपवास अन् उद्यापन करावं की नाही?

चला तर मग जाणून घेऊयात की नक्की या दोघांचा काही संबधं आहे का? किंवा नक्की कोणता उपवास पकडायच? आणि फक्त गुरुवारचा उपवास पकडला तर एकादशीचा उपवासपण धरला जाईल का? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहुयात.

तज्ज्ञ सांगतात की, मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशी व्रत हे पूर्णपणे वेगळे व्रत आहे. या दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ज्या लोकांचा एकादशीचं व्रत नाही त्यांनी मार्गशीर्ष गुरुवारी नेहमीप्रमाणे देवीची उपासना करून उद्यापन करावे आणि नैवेद्य दाखवावा.

गुरुवारचे व्रत अन्  एकादशीचा उपवास संबंध नाही

ज्यांना एकादशीचा उपवास करायचा असेल त्यांनी एकादशीचे व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून, उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा आणि ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा. यामुळे तुमचे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रतही पूर्ण होईल आणि एकादशीचा उपवासही धरला जाईल.

शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केलाय. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आणि हळदीकुंकू करण्यात काहीही हरकत नसल्याचे म्हटले आहे.

पुजेची मांडणी कशी करावी?

जिथे पुजा मांडायची आहे तिथे गोमुत्र किंवा गंगाजल शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा. त्यानंतर रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा. आता मध्य भागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा. कळशात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. आंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. हा नारळ म्हणजे विष्णू भगवंत असतात.

त्यानंतर तुमच्याकडे लक्ष्मीमातेचा मुखवटा असेल तर तो तुम्ही मांडू शकता किंवा लक्ष्मीचा फोटो,यंत्र, किंवा छोटी मूर्तीही तुम्ही ठेऊ शकता. तिला छान सजवून देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे, छोट्या पेल्यात दूध-साखर नक्की ठेवावे.

आता या पूजेची पद्धत नक्कीच प्रत्येकाच्या घरानुसार वेगवेगळी असू शकते.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)