Masik Shivratri 2021: भाद्रपदातील मासिक शिवरात्री आज, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व काय?; जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: Sep 05, 2021 | 12:11 PM

हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला अन्यनसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यातील मासिक शिवरात्रीचं वेगळं महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणी माता पार्वतीची पूजा केली जाते. (Masik Shivratri 2021 Know the date shubh muhurat and significance)

Masik Shivratri 2021: भाद्रपदातील मासिक शिवरात्री आज, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व काय?; जाणून घ्या एका क्लिकवर
Masik Shivratri
Follow us on

मुंबई: हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला अन्यनसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यातील मासिक शिवरात्रीचं वेगळं महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणी माता पार्वतीची पूजा केली जाते. हिंदी पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी जी व्यक्ती भोलानाथाची मनोभावे पूजा करते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. (Masik Shivratri 2021 Know the date shubh muhurat and significance)

मासिक शिवरात्रीच्या दिवशी दांम्पत्याने महादेव आणि पार्वतीची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशीही मान्यता आहे. काही लोक तर या दिवशी व्रत ठेवतात. चला तर मासिक शिवरात्रीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया.

मासिक शिवरात्री शुभ मुहूर्त

चतुर्थी तिथी 05 सप्टेंबर 2021ला सकाळी 08 वाजून 21 मिनटाने सुरू होईल. तसेच 06 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 07 वाजून 38 मिनटांनी समाप्त होईल.

मासिक शिवरात्रीची पूजा विधी

मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर घरातील मंदिरात दिवा पेटवा. नंतर गणेशाची पूजा अर्चना करा. मग महादेवाला गंगाजलाने अभिषेक घाला. भांग, धोत्रा, बेलपत्रं, फळे, फूल, मेवा आदी गोष्टी भोलेनाथाला अर्पण करा. त्यानंतर शिव चालिसा म्हणून आरती करा.

मासिक शिवरात्रीचं महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या मध्यरात्री भोलानाथ शिवलिंगाच्या रुपात प्रकट झाले होते. त्यानंतर भगवान विष्णू आणि महेश यांनी महादेवाची आरती केली होती. शास्त्रातील माहिती नुसार, आयुष्याचा उद्धार व्हावा म्हणून माता लक्ष्मी, सीता आणि रतीनेही शिवरात्रीचं व्रत ठेवलं होतं. मासिक शिवरात्रीचं व्रत ठेवल्यास लग्नात येणारे अडथळे दूर होतात. कोणत्याही प्रकारच्या समस्या सुटतात त्यामुळेच व्रत ठेवण्याचा सल्ला दिला जात असतो.

मासिक शिवरात्रीच्या दिवशी ही पथ्ये पाळा

1. मासिक शिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना भोलेनाथाला तुळशीचे पान अर्पण करू नका. पूजेतील पंचामृतातही तुळशीचा वापर करू नका.

2. पूजेच्यावेळी भगवान महादेवाला कुंकू अर्पण केलं जात नाही. महादेवाला विध्वंसकाचं रुप म्हणून पाहिलं जातं. मात्र, पार्वतीला कुंकू अर्पण केलं जातं.

3. महादेवाला पूजेच्यावेळी नारळही अर्पण केलं जात नाही. त्याशिवाय शंख जल अर्पण करू नका. तसेच शंखाचाही वापर करू नका. (Masik Shivratri 2021 Know the date shubh muhurat and significance)

 

टीप – या लेखात/ बातमीत देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या:

Shani Pradosh Vrat 2021 : आज शनि प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय

Ganesh Chaturthi 2021 | गणेशोत्सव कधीपासून, जाणून घ्या गणेश स्थापना आणि पूजेचे नियम

Chanakya Niti | या समस्यांना लहानसहान लेखून दुर्लक्ष केले तर विनाशाला द्याल आमंत्रण

(Masik Shivratri 2021 Know the date shubh muhurat and significance)