Mouni Amavasya : आज दर्श अमावस्या, महत्त्व आणि स्नान आणि दानाचा मुहूर्त

| Updated on: Feb 09, 2024 | 6:53 PM

यावेळी दर्श अमावस्या अतिशय विशेष मानली जाते कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, विनायक अमृत योग, हंस आणि मालव्य योग तयार होणार आहेत. हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात.

Mouni Amavasya : आज दर्श अमावस्या, महत्त्व आणि स्नान आणि दानाचा मुहूर्त
मौनी अमावस्या
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : पौष महिन्यात येणारी अमावस्येला दर्श अमावस्या (Darsha Amavasya) म्हणून ओळखली जाते. या अमावस्येला मौनी अमावस्या देखील म्हणातात. दर्श अमावस्या 9 फेब्रुवारीला म्हणजेच आज आहे. या दिवशी, दान आणि धार्मिक कार्य यज्ञ आणि कठोर तपश्चर्या सारखेच फळ देतात. अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचेही मोठे महत्त्व आहे. कारण याला माघ अमावस्या असेही म्हणतात, या दिवशी दान केल्यास शनीचा अशुभ प्रभाव टाळता येतो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, ऋषी मनूचा जन्म मौनी अमावस्येला झाला आणि मौनीची उत्पत्ती मनु या शब्दापासून झाली.

दर्श अमावस्या शुभ मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला दर्श अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या सकाळी 8:02 वाजता सुरू होईल आणि 10 फेब्रुवारीला पहाटे 4:28 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार दर्श अमावस्या 9 फेब्रुवारीलाच साजरी केली जाईल.

दर्श अमावस्या शुभ संयोग

यावेळी दर्श अमावस्या अतिशय विशेष मानली जाते कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, विनायक अमृत योग, हंस आणि मालव्य योग तयार होणार आहेत. हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात.

हे सुद्धा वाचा

मौनी अमावस्या पूजन पद्धत

दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळ संध्याकाळ स्नानापूर्वी संकल्प करावा. प्रथम डोक्यावर पाणी लावून नमस्कार करावा व नंतर स्नानास प्रारंभ करावा. स्नानानंतर काळे तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून मंत्रांचा जप करावा. मंत्राचा उच्चार केल्यानंतर वस्तूंचे दान करा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही या दिवशी पाणी आणि फळांचे सेवन करून उपवास करू शकता.

मौनी अमावस्येच्या दिवशी ग्रहशांतीसाठी उपाय

या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला रुद्राक्षाची माळ अर्पण करा. यानंतर धूप जाळून भगवान शिवाच्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. ही जपमाळ एकतर सोबत ठेवा किंवा गळ्यात घाला.

 रूपम देही, यशो देही, भोगम देही च शंकर.
भुक्ती मुक्ति फलं देही, गृहितवर्ग नमोस्तुते ।

मौनी अमावस्येच्या दिवशी दान

1. मोक्षासाठी गाय दान करा.
2. आर्थिक समृद्धीसाठी जमीन दान करा.
3. ग्रह किंवा नक्षत्रांमुळे येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळे तीळ दान करा.
4. रोग किंवा कर्जापासून मुक्त होण्यासाठी सोन्याचे दान करा.
5. कौटुंबिक सुखासाठी पात्रासोबत तुपाचे दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)