Mokshada Ekadashi 2021| ‘ध्यानी मनी विठ्ठल’, फुलांच्या सजावटींनी उजळून निघाला गाभारा, पाहा विठुरायाचे गोजिरे रुप
पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळेस ही सजावट विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली आहे.
1 / 5
हिंदू धर्मात श्रीमद भगवदत गीता हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुराणात अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाली आहे. या ग्रंथाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवसाला 'मोक्षदा एकादशी' देखील म्हणतात.
2 / 5
या दिवसाचे औचित्य साधून पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळेस ही सजावट विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली आहे.
3 / 5
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता, सोळखांबी, यांचा गाभारा तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु ,आष्टर , झेंडुची केशरी फुले , निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे ,पिवळा झेंडु ,कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस , गुलाब , शेवंती ,ड्रेसिना ,औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे, या सजावटीमध्ये सावळा विठूरायाचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे .
4 / 5
आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे, तिला मोक्षदा एकादशी म्हणतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते. जे आज मोक्षदा एकादशीचे व्रत करतात. त्यांनी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते.
5 / 5
पूजेच्या वेळी विष्णु सहस्रनामाचे पठण करावे, विष्णूजींची आरती करावी आणि मोक्षदा एकादशी व्रतकथेचे पाठ करावे यामुळे आपल्याला मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे.