मुंबई : नाग पंचमीच्या दिवशी सापांची पूजा करुन त्यांना संरक्षणाचा संदेश दिला जातो. श्रावण महिना महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो. तसेच, नाग महादेवाला खूप प्रिय आहे आणि ते नागाला गळ्यात धारण करतात.
श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करण्याबरोबरच त्यांच्या प्रिय नागांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळी नाग पंचमीचा सण 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आणि सर्व समस्या दूर करण्याचे उपाय जाणून घ्या.
पंचमी तिथी 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 24 मिनिटांपासून सुरु होत आहे आणि 13 ऑगस्ट रोजी 1 वाजून 42 मिनिटांनी समाप्त होईल. पण नाग पंचमीचा सण 13 ऑगस्ट रोजी उदय तिथीनुसार साजरा केला जाईल. या दिवशी पूजेची शुभ मुहूर्त 5 वाजून 49 मिनिटांपासून 8 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.
महादेवाच्या पूजेसाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो, तरी नागपंचमीचा दिवस त्यांच्या पूजेसाठी खूप खास दिवस असल्याची मान्यता आहे. या दिवशी, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींनी महादेवांचा रुद्राभिषेक केल्याने महादेव निश्चितपणे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
1. जर तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल तर या दिवशी दुधाने महादेवांचा रुद्राभिषेक करावा आणि त्यांच्याकडे तेजस्वी मुलाची इच्छा व्यक्ती करावी.
2. जर तुम्हाला तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर तुम्ही महादेवाला दह्याने अभिषेक करावा. तुमचे विघ्न दूर होतील.
3. जीवनात नेहमीच तणाव असेल, त्यामुळे ते दूर करण्यासाठी तुम्ही महादेवांना अत्तराने अभिषेक करावा. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तणाव कमी होईल.
4. जर तुमच्या घरात कोणी गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर तुम्ही महादेवाला तुपाचा अभिषेक करावा आणि कुटुंबाला निरोगी बनवण्याची इच्छा व्यक्त करावी.
5. ज्यांना मोक्ष प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी गंगाजलाने महादेवाचा रुद्राभिषेक करावा. असे केल्याने जीवनातील सर्व सुख प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करते.
6. जर तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण झालेली पाहायची असेल तर महादेवाला पंचामृताने अभिषेक करा आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.
7. शत्रू अधिक वाढले आहेत, मग त्यांच्या समाप्तीसाठी मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक करा.
8. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आणि कर्जापासून मुक्त होण्यासाठी महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा.
9. जीवनात पुण्य अर्ज करण्यासाठी तुम्ही महादेवाला पाण्याने अभिषेक घालावा.
Shravan Month 2021 | श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करावी, शिवामूठ वाहण्याची पद्धत काय? जाणून घ्याhttps://t.co/q7C1HREH9J#ShravanSomvar2021 #shravan #Shivamutha
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण