Nag Panchami 2024: हिंदू पंचागानुसार, नागपंचमी श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला म्हणजेच आज साजरा होत आहे. नागपंचमीला भगवान शंकराच्या पूजेबरोबरच गळ्यात असणाऱ्या नागदेवतेचीही पूजा केली जाते. नागपंचमी हा सण नाग किंवा नाग देवतेची पूजा करण्यासाठी समर्पित केला जातो. या दिवशी नागदेवतेच्या स्मरणार्थ विविध विधी आणि पूजा केल्या जातात.
असं मानलं जातं की, नागदेवता भक्तांना संरक्षण आणि समृद्धी प्रदान करतात. बऱ्याच भागात जिवंत कोबरा किंवा नागांची पूजा करून त्यांना दूध अर्पण केलं जातं. नागदेवतांची पूजा करताना भक्त विशेष मंत्रांचा जप करतात. नागपंचमीमध्ये पूजा मंत्राचं विशेष महत्त्व आहे कारण नागदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जप केला जातो …
नागपंचमी तिथी 9 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज (शुक्रवार) रात्री 12:36 वाजता सुरू झाली आहे आणि पंचमी तिथी 10 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या (शनिवार) पहाटे 3:14 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, यावेळी नागपंचमी 9 ऑगस्टला म्हणजेच आजच साजरी केली जात आहे.
नाग पंचमीच्या दिवशी सकाळी स्थान करून शंकराचं स्मरण करा आणि भगवान शिवाला अभिषेक करा त्यानंतर त्यांना बेलपत्र आणि जल अर्पण करा. विशेषत: नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख या नागांच्या आठ रूपांची पूजा केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला शेणखताने तयार केलेले साप लावा. या दिवशी नागदेवतेला अक्षत, दही, दुर्वा, गंध, कुशा, फुले, मोदक अर्पण करावेत. यानंतर ब्राह्मणांना घरी बोलावून दानधर्म करा. नागदेवतेची पूजा केल्यानंतर त्याच्या मंत्रांचा जप करा आणि कथा ऐका.
नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी आणि समस्या दूर होतात. नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोषाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी श्री सर्प सूक्ताचे पठण करावे. याशिवाय नागपंचमीच्या दिवशी राहू केतू यांची आशीर्वाद मिळवण्यासाठी तो “ऊं भ्रां भ्रीं भ्रौं स: राहवे नम:” आणि “ऊं स्त्रां स्त्रीं स्त्रौं स: केतवे नम:” या मंत्रांचा जप करा.
नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय कधीही सापांची पूजा करू नका. स्वतंत्रपणे सापांची पूजा करू नका. तसेच त्यांची पूजा फक्त भगवान शिवाचे अलंकार म्हणून करा.
आजच्या दिवशी ज्यांना सापांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांनी जमीन खोदू नये आणि हिरव्या भाज्या तोडू नयेत… अशी देखील मान्यता आहे.