नवरात्री 2024
मंत्र
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
म्हणजे देवी पृथ्वी, अग्नि, वायू, जल, आकाश या समस्त भूतांमध्ये शक्तीच्या रुपात अस्तित्वात आहे. या शक्तीमुळेच समस्त भूत आणि सकल पदार्थ गतिमान आहेत. त्या परम शक्तीला माझा अनेकवार नमस्कार आहे.
लेख
व्हिडीओ
वेब स्टोरीज
और देखेगॅलरी
बातम्या
नवरात्रोत्सव
सनातन परंपरेत शक्तीच्या साधनेसाठी नवरात्रीच्या 9 दिवसाला सर्वाधिक शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची 9 स्वरुपात पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीत शक्तीच्या नऊ स्वरुपात शैलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कुष्मांडा, देवी स्कंद माता, माता कात्यायनी, माँ कालरात्री, देवी महागौरी आणि सिद्धिदात्रींचा समावेश आहे. त्यांची या नऊ दिवसात पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं.
या नऊ दिवसात विधी-विधानानुसार व्रत, जप-तप केलं जातं. त्यामुळे वर्षभर भगवती मातेची कृपा भक्तांवर होते. देवीच्या कृपेने भक्तांना कधी धन धान्याची कमी जाणवत नाही. शारदीय नवरात्रीत दुर्गा पूजेसाठी विशेष मंडप टाकून तिची साधना आणि आराधना केली जाते. पश्चिम बंगालमध्ये हा सर्वात मोठा पर्व मानला जातो. पश्चिम बंगालमध्ये महिषासुरमर्दिनीची विशेष पूजा केली जाते. ढोल वाजत दुर्गा पूजा केली जाते. आरती केली जाते. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात देवी बसवल्या जातात. देवीची नऊ दिवस उपासना करून गरबा खेळला जातो.