हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण शारदीय नवरात्रीला उद्यापासून म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण 9 दिवस दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. नवरात्रीत 9 दिवस अखंड ज्योतही प्रज्वलित केली जाते. दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण 9 दिवस उपासही करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची शुभ वेळ कोणती, मुहूर्त कधी पर्यंत आहे, योग्य पद्धत काय, हे सर्व जाणून घेऊया.
पंचांगानुसार, या वर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 02 वाजून 58 मिनिटांपर्यंत वैध असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार या वर्षी शारदीय नवरात्रीला गुरुवार, 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
घट स्थापनेचा शुभ मुहूर्त
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. घटस्थापनेसाठी पहिली शुभ वेळ सकाळी 6 वाजून 15 मिनिटं ते 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे. तुम्हाला घटस्थापना साठी 1 तास 6 मिनिटे वेळ मिळेल.
घटस्थापनेचा दुसरा मुहूर्तही दुपारी आहे. हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो. तुम्ही दिवसभरात सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत दरम्यान कधीही घटस्थापना करू शकता. तुम्हाला दुपारी 47 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल.
घटस्थापना कशी करावी
कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावे, त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थर करावेत. कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा. या पाण्यात सुपारी, अक्षत आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर आंब्याची किंवा अशोकाची पाने 5 ठेवावीत, त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा, पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा.
नवरात्रीत रोज पूजा कशी करावी ?
नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी पूजा करावी. दोन्ही वेळा मंत्राचा जप करा आणि आरती देखील करा. नवरात्रीच्या काळात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नैवेद्य दाखवता येईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)