मुंबई : उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. विशेष म्हणजे उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच अत्यंत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासूनच मिळालीये. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते.
उर्फी जावेद आपल्या कपड्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडते. इतकेच नाही तर आतापर्यंत अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण देखील गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. मात्र, वादाचा आणि धमक्यांचा काहीच परिणाम उर्फीवर होत नाही.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच अत्यंत धक्कादायक खुलासा केला. उर्फी जावेद थेट म्हणाली की, माझे घर हे तीन रूमचे असून मी घरात कधीच कपडे घालत नाही. मी कपडे न घालताना घरात फिरते. उर्फी जावेद हिचे हे भाष्य ऐकून लोक हैराण झाले. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे फार जास्त कठीणच आहे.
नुकताच उर्फी जावेद हिने तिचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. उर्फी जावेद हिने शेअर केलेले हे फोटो विमानतळावरील असल्याचे सांगितले जातंय. यावेळी उर्फी जावेद नवरात्री स्पेशल लूकमध्ये दिसत आहे. उर्फी जावेद हिने डोक्यावर ओढनी आणि मल्टी रंगाचा लेहेंगा घातलेला आहे. या लूकमध्ये काही वेगळ्या पोझ देताना देखील उर्फी जावेद ही दिसत आहे.
उर्फी जावेद हिचा हा लूक बऱ्यापैकी लोकांना आवडल्याचे दिसतंय. कारण या लूकसोबत उर्फी जावेद हिने काहीही अतरंगी असे केले नाहीये. उर्फी जावेद हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिच्या या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून उर्फी जावेद ही सुधारली असल्याचे सांगितले जातंय.