घरातील या गोष्टी कधीच ठेवू नका रिकाम्या, अन्यथा व्हाल कंगाल

| Updated on: Dec 16, 2024 | 7:34 PM

वास्तुशास्त्रानुसार घरात असणाऱ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्राशी संबंधित नियम माहिती असणे आवश्यक आहे. घरामध्ये काही गोष्टी रिकाम्या ठेवणे अशुभ मानले जाते. या गोष्टी रिकाम्या राहिल्यास प्रगतीत नेहमीच अडथळे येतात.

घरातील या गोष्टी कधीच ठेवू नका रिकाम्या, अन्यथा व्हाल कंगाल
Follow us on

माणसाच्या आयुष्यात चढ-उतार हे सुरूच असतात. अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे माणसांचं नशीब बदलते आणि प्रगती थांबते. या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एका मागून एक नवीन समस्या येऊ लागतात. जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेकदा घरात काही गोष्टी अशा असतात ज्या रिकाम्या ठेवल्या तर त्याचे वाईट परिणाम होतात. वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मान्यतेनुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी प्रगती होण्यासाठी आणि घरात सुख शांती येण्यासाठी या गोष्टी कधीही रिकाम्या ठेवू नये. जाणून घेऊया कोणत्याही त्या गोष्टी.

धान्याच्या कोठ्या

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीही धान्याच्या कोठ्या रिकाम्या ठेवू नये. जर त्या रिकाम्या होत असतील तर त्या लगेच भरून ठेवा ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. पूर्ण भरलेल्या धान्याची कोठीही सकारात्मकता ऊर्जा देते आणि त्यामुळे तुमची प्रगती होते. यासोबतच दररोज देवी अन्नपूर्णेची पूजा करा. अन्नपूर्णेची पूजा केल्याने संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य वाढते. अन्नपूर्णेची रोज पूजा केल्याने घरातील धान्याच्या कोठ्या कधीच रिकाम्या होत नाहीत.

रिकामी बादली

वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नये. बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बाथरूममध्ये ठेवलेली बादली जर तुम्ही वापरत नसाल तर ती उलटी करून ठेवा. त्यासोबतच तुटलेले बादली वापरू नका. शक्य असल्यास अंघोळीसाठी निळ्या रंगाची बादली वापरा.

देवघरातील पाण्याचे भांडे

बहुतांश सगळ्यांच्याच घरांमध्ये देवघरे असते. देवघरांमध्ये पूजेशी संबंधित अनेक गोष्टी असतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात असलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर ते भांडे पाण्याने भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकणे आवश्यक आहे. अशी मान्यता आहे की देवालाही तहान लागते
पाण्याने भरलेले भांडे देवघरात ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि देव तृप्त राहतात. त्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा येते. देवघरातील पाण्याचे भांडे जर रिकामे असेल तर जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.

तिजोरी

आपल्या कपाटात असलेली तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी नसावी हे नेहमी लक्षात असू द्या. नेहमीच थोडे तरी पैसे तिजोरी मध्ये आणि पर्स मध्ये असावे. रिकामी पर्स आणि तिजोरी गरिबीकडे नेते त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे नेहमी असलेच पाहिजेत. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे कधीच रिकाम्या करू नका. या सोबतच तिजोरी मध्ये गाय, गोमतीचक्र, शंख ठेवू शकतात. त्यामुळे तुमच्या समृद्धीमध्ये आणखीन भर पडेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)