मुंबई : आज निर्जला एकादशी आहे (Nirjala Ekadashi 2021). हिंदू दिनदर्शिकेनुसार, निर्जला एकादशीचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि निर्जला एकादशीचे व्रत हे सर्व एकादशींपैकी सर्वात महत्वाचे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. निर्जला एकादशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि नियमांसंबंधित महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या (Nirjala Ekadashi 2021 Vrat Know The Shubh Muhurat Importance ANd Rules) –
एकादशीची तिथी 20 जून रोजी दुपारी 04 वाजून 21 मिनिटांनी सुरु होईल आणि 21 जून रोजी दुपारी 01 वाजून 31 मिनिटांनी समाप्त होईल. उदया तिथीनुसार, 21 जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत ठेवले जाईल आणि 22 जून रोजी उपवास सोडतील.
मान्यता आहे की हे व्रत पाळणे फार कठीण आहे. कारण हे व्रत पाळणारे पाण्याचे थेंबसुद्धा घेत नाही. या निर्जला एकादशीला उपवास करण्याच्या एक दिवस आधी भाताचा त्याग करावा. असे म्हणतात की, हे व्रत पाळणाऱ्याने व्यक्तीने सात्विक आहार घ्यावा.
शास्त्रानुसार, प्रत्येकाने निर्जला एकादशीचे व्रत आपल्या जीवनात ठेवावे. या व्रताला निर्जला एकादशी असे म्हणतात. त्याशिवाय याला पांडव एकादशी देखील म्हणतात. याबद्दल एक आख्यायिका देखील आहे. मान्यता आहे की, महाभारत काळात भीमसेन यांनी हे व्रत पाळले होते, ज्यामुळे त्याला स्वर्ग प्राप्त झाले. या व्यतिरिक्त असेही मानले जाते की जी व्यक्ती या व्रताचे पालन करतो त्याला मोक्ष मिळतो. तसेच, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या व्रताला भगवान विष्णूची विधीवत पूजा केली जाते.
मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत ठेवल्यास संपूर्ण वर्षभर एकादशीचे फळ मिळते. हिंदी दिनदर्शिकेनुसार एकादशी महिन्यातून दोनदा येते आणि अशा प्रकारे एकादशी संपूर्ण वर्षात 24 वेळा येते.
सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा, जाणून घ्या नियम आणि फायदेhttps://t.co/WBSwMD8YDb#LordShiva #Mahadev #MahāmrityunjayaMantra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
Nirjala Ekadashi 2021 Vrat Know The Shubh Muhurat Importance ANd Rules
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :