कंगवा ही अतिशय सामान्य गोष्ट आहे आणि सहसा कुटुंबातील अनेक सदस्य घरांमध्ये एकच कंगवा वापरतात. घरी आलेले पाहुणे किंवा जवळचे मित्रही त्यांचा वापर करतात. असे करणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक तर आहेच, पण वास्तूच्या दृष्टिकोनातून ते अशुभही मानले जाते. त्यामुळे कोणालाही आपला कंगवा वापरुन देऊ नका.
अनेक घरांमध्ये कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक एकमेकांचे कपडे घालत असतात. तर असे करणे म्हणजे दुर्दैवाला आमंत्रण देणे होय. यामुळे नशीब कमी होते . त्याच प्रमाणे शरीरावर अॅलर्जीसारख्या अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे कोणाला कपडे देताना नक्की विचार करा.
तुमची लग्नाची अंगठी चुकूनही दुसऱ्याला घालायला देऊ नका.असे केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येतात. अशी मान्याता आहे.
इतरांचे घड्याळ घालणे किंवा आपले घड्याळ इतरांना घालण्यासाठी देणे हे तुमच्या करिअरमध्ये वाईट काळ आणू शकते. त्यामुळे हे काम करणे टाळा.
शूज आणि चप्पल शनिशी संबंधित आहेत. एकमेकांचे जोडे आणि चप्पल परिधान केल्याने शनिदोष होतो आणि शनिदोषामुळे जीवनात अनेक संकटे येतात.