अंकशास्त्रानुसार (Numerology 6 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (6 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.
- अंक- 1
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. वैवाहिक जीवनात काही मतभेत आणि तणाव असेल तर ते संपुष्टात येईल. जोडीदाराला खुश करण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. चाकरमान्यांसाठी दिवस सामान्य राहील.
शुभ अंक- 25
शुभ रंग- हिरवा
- अंक- 2
भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकार्याशी झालेल्या मतभेदामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. वाणीवर ताबा ठेवा. विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल. प्रेम प्रकरणांसाठी दिवस अनुकूल आहे.
शुभ संख्या 9
शुभ रंग – गुलाबी
- अंक- 3
आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल. व्यावसायिकांना गरजेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. नोकरीत रखडलेल्या कामांचा ताण येईल. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका.
चांगली संख्या – 5
शुभ रंग – निळा
- गुण-4
सरकारी नोकरीत काम करणार्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्याचे काम काळजीपूर्वक करावे लागेल. चालढकलपणा त्यांच्या अंगावर येऊ शकतो. व्यवसायात अचानक नफा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सहवास आनंद देऊन जाईल.
शुभ अंक- 9
शुभ रंग – पिवळा
- अंक- 5
आजचा दिवस व्यवसाय करणार्या लोकांसाठी छोट्या नफ्याच्या संधी घेऊन येईल, ज्या तुम्हाला ओळखून त्वरित अंमलात आणाव्या लागतील. मित्र आणि कुटूंबासोबत वेळ घालवाल. नवीन ओळखीचा भविष्यात फायदा होईल.
शुभ संख्या- 11
शुभ रंग – लिंबू
- अंक-6
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. विवाह इच्छुकांसाठी स्थळं येतील. नोकरीमध्ये कामात मन रमेल. भूतकाळाचा विचार सोडून नवीन संधीचा फायदा घ्यावा. प्रेम प्रकरणात यश संभवते.
शुभ अंक-4
शुभ रंग- पांढरा
- अंक-7
आजचा दिवस तुच्यासाठी सोन्यासारखा आहे. सर्वच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. जुन्या प्रयत्नांना यश मिळेल. समाधानकारक यशामुळे जोडीदार खुश असेल.
शुभ अंक-5
शुभ रंग- गुलाबी
- अंक-8
आजचा दिवस संमिश्र असेल. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही. विचारात रममाण होऊन वेळ वाया घालवू नका. मतभेदावरु जोडीदारामध्ये खटके उडतील.
शुभ अंक- 6
शुभ रंग- हिरवा
- अंक-9
दिवस धावपळीचा असेल. कामामध्ये उत्साह असेल. नवीन योजना आखाल. व्यावसायिकांसाठी दिवस उत्तम आहे. रखडलेली कामं मार्गी लागतील.
शुभ अंक- 1
शुभ रंग- तांबडा
(वारील माहिती अंकशास्त्राच्या मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला कुठल्याही प्रकारे दुजोरा देत नाही.)