गलेलठ्ठ पगार असूनही बरकत नाही? ‘या’ सुगंधी फुलाने आयुष्य बहरेल, अफाट पैसे कमवाल

| Updated on: Dec 09, 2024 | 5:13 PM

घरात पारिजाताचं रोप लावल्याने आर्थिक समृद्धी येते असे ज्योतिषशास्त्र सांगते. हे रोप लक्ष्मी देवीला प्रिय आहे आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. नोकरी, व्यवसाय आणि अडकलेल्या पैशांसाठीही पारिजाताच्या फुलांचा उपयोग सांगितला जातो. या रोपाचे योग्य दिशेने रोपण आणि पूजा केल्याने घरातील बरकत वाढते आणि आर्थिक स्थैर्य येते.

गलेलठ्ठ पगार असूनही बरकत नाही? या सुगंधी फुलाने आयुष्य बहरेल, अफाट पैसे कमवाल
गलेलठ्ठ पगार असूनही बरकत नाही? 'या' सुगंधी फुलाने आयुष्य बहरेल
Follow us on

आपण मेहनत करतो, पैसे कमावतो. अनेकदा आपल्याला आपल्या कामाचा चांगला मोबदला देखील मिळतो. अनेकांना गलेलठ्ठ पगारही मिळतो. पण असं असलं तरी कमावलेला पैसा बऱ्याचदा टिकत नाही. महिनाअखेरपर्यंत आपल्यावर मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडे पैशांची मदत घेण्याचा प्रसंग ओढावतो. यामुळे माणूस कर्जात ढकलला जातो. किंवा महिन्याला मिळणारा पगार पूर्ण संपून जातो आणि हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे आपण त्रस्त होतो. विशेष म्हणजे आपण प्रचंड काटकसर करण्याचा प्रयत्नही करतो. पण खर्च इतका असतो की तो केल्याशिवाय भागत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला हातात आलेला पैसा कायम सोबत राहावा यासाठी ज्योतिषशास्त्राकडून काही उपया सूचवण्यात आले आहेत. आपण आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पारिजातकाचं रोप लावलं तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर पडेल.

पारिजाताच्या फुलास हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. तुम्ही पारिजाताच्या फुलास अनेक ठिकाणी पाहिलं असेल. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, ज्या घरात पारिजाताचं रोप असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो. पारिजाताच्या फुलाचं रोपटं योग्य दिशेस लावल्यास अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात. पारिजाताच्या रोपाचं घरात ठेवल्याने नेमके काय-काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.

घरात बरकत राहील

पारिजाताच्या रोपाने आणि फुलांनी घरात बरकत राहते. पारिजाताचं फूल हे लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे. असं म्हणतात की, जिथे या फुलाचा सुगंध असतो तिथे लक्ष्मी देवी थांबून जाते. त्यामुळे पारिजाताचं रोप घरी ठेवल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. अशा लोकांची चारपटीने प्रगती होते, असं म्हणतात. यासोबतच घरातील लोकांचं मानिस आरोग्य चांगलं होतं. घरात सकरात्मक ऊर्जा वाढते.

नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल

पारिजाताचं रोप घरात लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्या रोपट्यात लक्ष्मी देवीचा वास असतो. घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेस या रोपास लावलं गेलं तर घरातील वास्तू दोष नाहीसे होतात. या रोपाच्या फुलाला पाहिल्यानंतर आयुष्यात शांतता येते, मनाला खूप समाधान वाटतं.

नोकरी-व्यवसायात फायदा

तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा नोकरीत हवं तसं यश मिळत नसेल, तसेच व्यवसायात यश मिळत नसेल तर 21 पारिजाताच्या फुलांना लाल कपड्यांमध्ये बांधून घरात लक्ष्मीदेवीच्या समोर ठेवावेत. असं मानलं जातं की, असं केल्याने आपली प्रगती होते. तसेच नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतात.

अडकलेले पैसे मिळतील, कर्जमुक्त व्हाल

याशिवाय पारिजाताचं रोप घरात लावल्यास आणखी एक फायदा होता. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा सुटतात. तसेच तुम्हाला कर्जमुक्त देखील होता येतं. फक्त पारिजाच्या रोपाचं एक तुकडं लाल कपड्यात बांधून लक्ष्मी देवीच्या समोर ठेवायला हवं. त्यानंतर विधीवत पद्धतीने लक्ष्मी देवी आणि रोपाच्या तुकड्याची पुजा करावी, त्या रोपाला हळद-कुंकू वाहावे. यानंतर कनकधारा स्त्रोतचं पठण करावे, यामुळे आपल्याला नक्की फायदा होईल, असं ज्योतिष शास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)