प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचे आणि नशिबाचे विश्लेषण ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या आधारे केले गेले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीच्या लोकांसाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला अतिशय शुभ मानले जाते. लाल रंग सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाते. अनेक लोक त्यांच्या मनगटावर लाल रंगाचा दोरा बांधतात पण काही राशीच्या लोकांसाठी लाल रंगाचा दोरा बांधणे अशुभ ठरू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांसाठी लाल रंगाचा दोरा बांधणे अशुभ आहे.
लाल रंगाचा दोरा बांधण्याचे फायदे
धार्मिक मान्यतेनुसार हातावर लाल रंगाचा दोरा बांधल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहते. यासोबतच हनुमानाचा आशीर्वादही प्राप्त होतो. मंगळाचा रंग लाल आहे त्यामुळे लाल रंग धारण केल्याने कुंडलित मंडळाची स्थिती मजबूत होते. लाल रंगाचा दोरा हातात बांधल्याने आर्थिक लाभ होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लालरंगाचा दोरा बांधणे टाळावे. असे मानले जाते की या राशीचे शासक ग्रह शनि आहे आणि शनि देवांना लाल रंग आवडत नाही. जर मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लाल रंगाचा दोरा बांधला तर शनिदेव क्रोधित होतात अशी मान्यता आहे.
कुंभ राशीचे लोक बुद्धिमान आणि सर्जनशील असतात. पण ही लोकं काही प्रमाणात अहंकारी असतात. कुंभ राशीच्या लोकांनी लाल रंगाचा दोरा बांधल्याने ते आणखीन अहंकारी होऊ शकतात. यामुळे इतरांपासून ते दूर जायला लागतात. म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी हातावर लाल रंगाचा दोरा बांधणे टाळावे.
मकर रास असणारे सहनशील आणि मेहनती असतात. पण शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावामुळे त्यांच्या जीवनात अनेकदा चढउतार येत असतात. लाल रंगाचा दोरा हातात बांधल्यानंतर आयुष्यात येणारे चढ-उतार आणखीन वाढतात. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तीने हातावर लाल रंगाचा दोरा बांधणे टाळावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)