मुंबई : हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिना सुरु आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि गणपतीची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भाद्रपद पौर्णिमा ही श्राद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. पितृ पक्ष या दिवसापासून सुरू होतो. यावेळी श्राद्ध पौर्णिमा 20 सप्टेंबर 2021 रोजी आहे. श्राद्धाच्या तारखा पौर्णिमेपासून सुरू होतात.
पितृ पक्ष 2021 (Pitru Paksha 2021) सोमवार 20 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरु होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत सुरु राहतो. संपूर्ण 15 दिवसांचा हा श्राद्ध पक्ष आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. यावेळी पितृ पक्ष बुधवार, 6 ऑक्टोबरपर्यंत असेल.
असे म्हटले जाते की, पितृपक्षाच्या वेळी मुंडण, साखरपुडा, लग्न, घर खरेदी इत्यादी कोणतेही शुभ कार्य करु नये. साखरपुडा आणि लग्नासारख्या गोष्टींविषयी बोलणेही टाळले जाते.
श्राद्ध पक्ष दरम्यान पंडित किंवा कोणत्याही मान्य व्यक्तीला जेवण दिले जाते. असे मानले जाते की हे अन्न थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते. अशा परिस्थितीत, आदरणीयांना पूर्ण श्रद्धा आणि आदराने जेवण द्या.
श्राद्धासाठी सर्वात योग्य वेळ सकाळपासून ते दुपारी साडेबारापर्यंत मानली जाते. या वेळेपर्यंत जेवण देण्यात आले पाहिजे.
श्राद्ध दरम्यान जेव्हा ब्राह्मणांना जेवण दिले जाते तेव्हा नेहमी दोन्ही हातांनी अन्न वाढले पाहिजे आणि अधिक बोलू नये.
श्राद्धच्या दिवशी जेवण तयार करताना शुद्धतेची पूर्ण काळजी घ्या. जेवणात कांदा आणि लसूण सारख्या गोष्टी वापरु नका. याशिवाय जमिनीच्या आत वाढणाऱ्या भाज्या जसे कंद-मुळे यांचा वापर करु नये.
जेवणानंतर ब्राह्मणांना आपल्या क्षमतेनुसार वस्त्र किंवा दक्षिणा देऊन त्यांच्या पायाला स्पर्श करावा आणि आशीर्वाद घ्यावा.
आपले पूर्वज आदरणीय असतात. असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या वेळी ते आपल्यामध्ये येतात. अशात हे 15 दिवस त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याशी आध्यात्मिकरित्या जुळण्यासाठी असतात. अशा परिस्थितीत आपल्या सवयी, छंद आणि शुभ कार्यावर मर्यादा घालून त्यांच्याबद्दल आपला आदर आणि समर्पण दिसून येते. जेणेकरुन पूर्वजांना कळू शकेल की त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अजूनही त्यांची उणीव जाणवते. असे मानले जाते की, आपल्याप्रति आपल्या मुलांचे प्रेम पाहून पितर त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देऊन जातात.
असे म्हटले जाते की, या 15 दिवसांमध्ये पितृलोकात पाण्याची कमतरता असते. अशा परिस्थितीत आपले पूर्वज पृथ्वीवरील आपल्या प्रियजनांच्या सानिध्यात येतात. जेव्हा त्यांचे वंशज तर्पण करतात तेव्हा पूर्वज समाधानी होतात आणि त्यांना शांती मिळते. अशा परिस्थितीत कुटुंबात सुख आणि समृद्धी टिकून राहते.
Pitru Paksha 2021 : पितृ पक्षात शुभ कार्य का केले जात नाही, जाणून घ्याhttps://t.co/ZL7IwDvhma#PitruPaksha2021 #ShradhPaksha #BhadrapadPurnima
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :