स्वतःचे घर असणे हे सगळ्यांचेच स्वप्न असते. मात्र, हे स्वप्नवत घर बांधून झाल्यावर आणखी चिंता वाढू लागतात. अनेकदा घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार घरात काही उपाय केल्यास या समस्यांचे निवारण होऊ लागते. तुम्हालाही अशा वास्तू समस्या असतील, तर त्या दूर करण्यासाठी आपण कोणती झाडे घरामध्ये लावली पाहिजेत. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बांबू
प्राजक्तांच्या फुलाचा सुगंध सर्वत्र पसरतो. प्राजक्ताचे झाड आपण घरासमोर लावले पाहिजे. दररोज प्राजक्ताची फुले तोडून देवाला वाहिली पाहिजे. यामुळे पुण्य मिळते.
सुख-समृद्धी आणि संतान प्राप्ति हवी असेल तर आपण आपल्या घरामध्ये दूर्वा लावल्या पाहिजेत. दररोज या दूर्वा तोडा आणि गणपतीला वाहा. यामुळे सुख-समृद्धी संतान प्राप्ति होईल.
वास्तुशास्त्रानुसार आपण घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आवळ्याचे झाड लावले पाहिजे. जर आपण दररोज आवळ्याच्या झाडाची पुजा केली तर आपल्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.