न्यू जर्सी : अमेरिकेत न्यू जर्सीमधील रॉबिंसविले येथे बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराच उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबाहेरील आधुनिक काळातील हे मोठ मंदिर असल्याच दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. रॉबिंसविलेमधील बीएपीएस अक्षरधामला पंतप्रधान मोदींनी एक पत्र लिहिलय. बीएपीएस अक्षरधाम संस्था आणि या उपक्रमात सहभागी असलेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षरधाम महामंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमातून भारतीय वास्तुशास्त्राची उत्कृष्टता आणि वैभवाशील प्राचीन संस्कृतीच दर्शन घडतं असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. अक्षरधाम महामंदिरामुळे प्रवासी भारतीय खासकरुन युवा वर्ग जोडला जाणार आहे, असं मत मोदींनी व्यक्त केलं.
“या मंदिराच्या सौंदर्याने आम्ही आश्चर्यचकीत झालो. शांतता, सौहार्द आणि मानवतेचा यातून संदेश देण्यात आला आहे” असं ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. 8 ऑक्टोबरला अक्षरधाम महामंदिराच उद्घाटन होणार आहे. “हे फक्त प्रार्थनास्थळ नाहीय. ही एक ओळख आहे. यातून भारतीय मुल्य, संस्कृती आणि जगासाठी दिलेलं योगदान दिसतं” असं ऋषी सुनक यांनी म्हटलय. “भारत आणि अमेरिकेची मैत्री अतूट आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये परस्पर संवादातून हे नातं अधिक भक्कम करण्यात येतय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
‘आपला भर सेवा आणि स्वत:पलीकडे इतरांचा विचार’
“भारताकडे असलेल्या स्थीय आणि किर्तीवान अध्यात्मिक वारशाच वैश्विक महत्त्व आहे. आपल्या अध्यात्मात सामाजिक संस्कृतीचा वारसा आणि तत्व आहेत. आपलं जे तत्वज्ञान आणि परंपरा आहेत, त्याचा भर सेवा आणि स्वत:पलीकडे इतरांचा विचार यावर आहे” असं पंतप्रधान मोदींनी लिहिलय. 30 सप्टेंबरला शनिवारी अमेरिकेच्या न्यू जर्सीमधील रॉबिंसविले येथे बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम उद्घाटन समारंभाच्या सीरीजचा शुभारंभ केला. सेलिब्रेटिंग सनातन धर्म’ कार्यक्रमात 400 हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या.