Mahaumbh 2025 : महाकुंभ कधी आणि कुठे आहे? कधी आहे शाही स्नान?; तारखा नोंदवून ठेवा

| Updated on: Dec 19, 2024 | 1:13 PM

2025 चा प्रयागराज कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार आहे. शाही स्नानांचे महत्त्वपूर्ण दिवस पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री आहेत. उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्यासाठी व्यापक वाहतूक व्यवस्था आणि महिला व वृद्धांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कुंभमेळा भारतातील चार पवित्र नद्यांवर आयोजित केला जातो.

Mahaumbh 2025 : महाकुंभ कधी आणि कुठे आहे? कधी आहे शाही स्नान?; तारखा नोंदवून ठेवा
Follow us on

भारतासह संपूर्ण जगात कुंभमेळा प्रसिद्ध आहे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी येत असतो. यंदा 2025मध्ये कुंभमेळा येणार आहे. त्यापूर्वी 2013मध्ये कुंभमेळा पार पडला होता. धार्मिक मान्यतेनुसार, महाकुंभमधील शाही स्नानानंतर सर्व पापांमधून मुक्ती मिळते. दर 12 वर्षानंतर भारतातील चार पवित्र नद्या आणि चार तीर्थस्थानांवर आयोजित केला जातो. परंतु महाकुंभाचं आयोजन केवळ प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन येथे केले जाते. आताही 12 वर्षानंतर महाकुंभ मेळ्याचं आयोजन होणार आहे. त्याच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊ या.

2025मध्ये 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होईल. 12 वर्षानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ होणार आहे. यापूर्वी 2013मध्ये प्रयागराजला महाकुंभ मेळावा पार पडला होता. नागा साधू या कुंभ मेळ्याला हजेरी लावतात. नागा साधू या मेळाव्याचं खास आकर्षण आहेत.

महाकुंभ 2025च्या शाही स्नानाची तारीख

  • पौष पौर्णिमा – 13 जानेवारी 2025
  • मकर संक्रांती – 14 जानेवारी 2025
  • मौनी अमावस्या – 29 जानेवारी 2025
  • वसंत पंचमी – 3 फेब्रुवारी 2025
  • माघ पौर्णिमा – 12 फेब्रुवारी 2025
  • महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी 2025

कुंभमेळ्याचं आयोजन कुठे कुठे?

  • प्रयागराज – जेव्हा बुध देव वृषभ राशीत असतो आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा कुंभ मेळाव्याचं आयोजन प्रयागराजला केलं जातं.
  • हरिद्वार – जेव्हा सूर्य देव मेष राशी आणि बृहस्पती कुंभ राशीत असतो तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं.
  • नाशिक – जेव्हा सूर्य देव आणि बृहस्पती दोन्ही सिंह राशीत असतात, तेव्हा कुंभमेळा महाराष्ट्रातील नाशिकमध्ये होतो.
  • उज्जैन – जेव्हा बृहस्पति देव सिंह राशीत आणि सूर्यदेव मेष राशी असतात तेव्हा उज्जैनमध्ये कुंभ मेळाव्याचं आयोजन होतं.

नगरपालिकेची खास तयारी

प्रयागराजमध्ये कुंभमेळाव्याचं आयोजन होणार असल्याने उत्तर प्रदेश नगर पालिकेने या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. यूपी परिवहन निगमने हा महाकुंभ मेळावा अत्यंत चांगला पार पडावा म्हणून सात हजार बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि प्रवाशांना प्रवास करणं सोपं जावं, तसेच बाहरेच्या भक्तांनाही प्रवासाची सोय व्हावी म्हणून परिवहन विभाग अतिरिक्त बसेस चालवणार आहे.

या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिला आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहे. त्याचं प्लानिंग सरकारने सुरू केलं आहे. महाकुंभ 2025 दरम्यान, 6800 परिवहन आणि 200 वातानुकुलित बसेच चालवल्या जाणार आहेत. महाकुंभ मेळाव्याचा मुख्य स्नानाचा कार्यक्रम 13 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 दरम्यान असणार आहे. त्यात मौनी अमावस्येचं शाही स्नान 29 जानेवारी रोजी आणि वसंत पंचमीचे शाही स्नान 3 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.