Premanand Ji Maharaj : आयुष्यात प्रत्येकाला यश हवे असते. पण यश हे एकदम सहजा सहजी मिळतेच असे नाही. प्रेमानंद महाराजांनी दृष्टांतासह अनेक उदाहरण देत लोकांचे जीवनात अमुलाग्र बदल केला आहे. त्यांचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. अनेक दिग्गजांनी त्यांच्या दरबारात हजेरी लावली आहे. सर्व जाती-धर्माचे लोक त्यांच्या दरबारात येतात. त्यांना व्यथा, अडचणी सांगतात. त्यावर ते साधे साधे उपाय सांगतात. त्यांनी सांगितलेले काही उपाय अंगिकारल्यास तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकतात. तुम्हाला नशीब बदलायचे असेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल. मोठा पल्ला गाठायचा असेल तर हा मंत्र जरूर जपा.
कर्माचे महत्त्व
प्रेमानंद महाराज यांच्या मते, यशाचा मार्ग हा तुमच्या कर्माने ठरतो. कर्म केल्याशिवाय, कोणतेही काम न करता यशस्वी होता येत नाही. तुमचे ध्येय गाठण्यासाठी कष्ट करावे लागतात. केवळ नशीबावर अवलंबून असणाऱ्यांच्या हातात निराशा येते. कर्मामुळेच तुमचे नशीब पालटू शकते.
संयम आणि समर्पण
प्रेमानंद महाराज यांच्या मते, संयम आणि समर्पण असेल तरच यशाचे वाटेकरी होता येते. यश चाखता येते. अनेकदा तुमच्या मार्गात अनंत अडचणी आणि मोठे आव्हान उभं ठाकते. कठीण परिस्थिती येते. पण या अडथळ्यांना पार करून जो निर्धाराने, सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तोच यशस्वी होतो.
सकारात्मक विचार
प्रेमानंद महाराज यांच्या मते, यश आणि अपयश यांच्यामध्ये सर्वात मोठे अंतर हे तुमच्या दृष्टिकोणाचे आहे. जर तुमचे विचार सकारात्मक आहे. तुम्ही चुका स्वीकारून त्या दुरूस्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहचाल. सकारात्मक विचार केवळ जीवनात तुम्हाला उंचावणार नाहीत. तर मानसिक शांतता सुद्धा देतील.
अहंकाराचा वारा न लागो राजसा
यशाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा हा अहंकार आहे. प्रेमानंद महाराजांनुसार, ज्या लोकांमध्ये अहंकार आहे, ते त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहचत नाहीत. तुमच्या चुका स्वीकारण्यास अहंकाराचा अडथळा नेहमी मधात येतो. आणि चुका दुरुस्त होत नाहीत. विनयशीलता, विनम्रतेने अनेक कामे मार्गी तर लागतातच पण तुमच्या चुका स्वीकारण्याचे औदार्य तुम्हाला अजून महान बनवते.