Putrada Ekadashi : श्रावणातल्या पुत्रदा एकादशीला आहे विशेष महत्त्व, पुत्र प्राप्तीसाठी अशाप्रकारे केले जाते व्रत

| Updated on: Aug 23, 2023 | 2:47 PM

Putrada Ekadashi धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे सुख प्राप्त होते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठीही हे व्रत पाळले जाते.

Putrada Ekadashi : श्रावणातल्या पुत्रदा एकादशीला आहे विशेष महत्त्व, पुत्र प्राप्तीसाठी अशाप्रकारे केले जाते व्रत
एकादशी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2023) व्रत पाळले जाते. सर्व एकादशीमध्ये या एकादशीला विशेष मानले जाते. या एकादशीचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते. एक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात. या दोन्ही एकादशींना समान महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे सुख प्राप्त होते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठीही हे व्रत पाळले जाते.  एका वर्षात एकूण 24 एकादशी असतात, पण जेव्हा अधिकामास किंवा मलमास येतो तेव्हा त्यांची संख्या 26 होते. गेल्या 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत आधिक मास म्हणजेच मलमास होता, ज्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पुरुषोत्तमी एकादशी साजरी केली जात होती. या दोन एकादशी एकत्र करून जेव्हा जेव्हा अधिकामास किंवा मलमास येतात तेव्हा वर्षभरात एकूण 26 एकादशी येतात.

पुत्रदा एकादशी व्रत शुभ मुहूर्त

शुक्ल एकादशी तिथी सुरू होते – 27 ऑगस्ट 2023 सकाळी 12.08 वाजता
शुक्ल एकादशी तिथी समाप्त – 27 ऑगस्ट 2023 रात्री 9.32 वाजता
पुत्रदा एकादशी व्रताची तारीख – 27 ऑगस्ट 2023
एकादशी व्रताची वेळ – 28 ऑगस्ट 2023 सकाळी 5.57 ते 8.31

पुत्रदा एकादशीचे महत्त्व

पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ पुत्र प्राप्तिसाठीच नाही तर मुलांच्या प्रगतीसाठीही केले जाते. पौराणिक परंपरेनुसार एकादशीचे व्रत अवश्य करावे. याशिवाय ज्या व्यक्तीला धन, संतती, स्वर्ग, मोक्ष, सर्व काही मिळवायचे आहे, त्यांनी हे व्रत पाळावे. दुसरीकडे, ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना आधीच मूल झाले आहे आणि ज्यांना आपल्या मुलाचे उज्ज्वल भविष्य हवे आहे, आयुष्यात खूप प्रगती व्हावी अशी इच्छा आहे, अशा लोकांसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत वरदानापेक्षा कमी नाही.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)