मुंबई : दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी राखीचा सण 22 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. हा दिवस भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात रक्षाबंधनाचा सण खूप महत्वाचा आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची आणि आनंदी आयुष्याची मनोकामना करते. भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण करण्याचे आणि तिला भेटवस्तू देण्याचे वचन देतो.
शास्त्रांमध्ये राखीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की राखी नेहमी भद्रा आणि राहू काळ रहित काळात बांधली पाहिजे. यावेळी भद्रकाळ राखीच्या दिवशी नाही. पण, राहू कळाची खबरदारी घ्यावी. ज्योतिषशास्त्रात राखीच्या दिवशी काही विशेष उपाय करण्यास सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. या उपाययोजनांबद्दल जाणून घेऊया –
? राखीचा सण दरवर्षी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी चंद्र श्रावण नक्षत्रात पूर्ण स्वरुपात असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. या दिवशी चंद्राची पूजा केल्याने मन शांत राहते. असे केल्याने मनाला शांती मिळते.
? आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी, राखीच्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या हातातून एका गुलाबी रंगाच्या कपड्यात अक्षता, सुपारी आणि एक रुपयाचे नाणे घ्यावे. हा कापड तुमच्या तिजोरीत ठेवा. ज्योतिषांच्या मते हा उपाय केल्याने आर्थिक समस्या लवकरच दूर होतात.
? ज्योतिषांच्या मते, बहिणींनी आपल्या भावाला दृष्टिदोषापासून वाचवण्यासाठी तुरटी घ्यावी आणि सात वेळा ती आपल्या भावावरुन उतरवून तुरटीला गॅसवर जाळावे. याशिवाय, ती चौकातही फेकली जाऊ शकते. असे केल्याने दृष्टीदोष दूर होतो.
? जर तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र दोष असेल तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी “ओम सोमेश्वराय नम:” या मंत्राचा जप करावा. असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
? रक्षाबंधनाच्या दिवशी देवतांना राखी बांधल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात. या दिवशी सर्वप्रथम गणपतीला राखी बांधा. असे केल्याने भाऊ आणि बहीण यांच्यातील दुरावा दूर होतो आणि आपसात प्रेम वाढते. याशिवाय, हनुमानजींना राखी बांधल्याने आयुष्यात येणारे सर्व त्रास आणि संकट दूर होतात.
Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही ही कामे करु नये, अन्यथा समस्या उद्भवू शकतातhttps://t.co/mTRoT7Rf44#RakshaBandhan2021 #Rakhi #SPIRITUAL
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त