Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनला या अशुभ मुहूर्तावर चुकूनही भावाला राखी बांधू नका, जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त कोणता?

| Updated on: Aug 19, 2021 | 8:20 AM

ज्योतिष शास्त्रानुसार, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त पाहणे आवश्यक आहे, जेणेकरुन कालांतराने भाऊ आणि बहिणीचे हे नाते आणखी दृढ होईल. अशा स्थितीत जास्तीत जास्त लक्ष भद्रा काळ आणि राहू काळ याकडे दिले जाते. हे अशुभ काळ मानले जातात. राखी बांधण्याच्या शुभ आणि अशुभ मुहूर्त आणि राखी बांधण्याच्या नियमांबद्दल येथे जाणून घ्या

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनला या अशुभ मुहूर्तावर चुकूनही भावाला राखी बांधू नका, जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त कोणता?
Raksha-Bandhan
Follow us on

मुंबई : रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी रक्षाबंधन रविवारी 22 ऑगस्ट रोजी येत आहे. रक्षाबंधन हा हिंदूंच्या विशेष सणांपैकी एक मानला जातो. हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधतात आणि त्याला दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्याची शुभेच्छा देतात.

त्याचबरोबर भाऊ बहिणीला प्रत्येक सुख-दु: खात साथ देण्याचे आणि संरक्षणाचे वचन देतो. या दिवशी भाऊ बहिणीला भेटवस्तूही देतो. ज्योतिष शास्त्रानुसार, राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त पाहणे आवश्यक आहे, जेणेकरुन कालांतराने भाऊ आणि बहिणीचे हे नाते आणखी दृढ होईल. अशा स्थितीत जास्तीत जास्त लक्ष भद्रा काळ आणि राहू काळ याकडे दिले जाते. हे अशुभ काळ मानले जातात. राखी बांधण्याच्या शुभ आणि अशुभ मुहूर्त आणि राखी बांधण्याच्या नियमांबद्दल येथे जाणून घ्या –

या अशुभ काळात राखी बांधू नका

पंचांगानुसार भद्राची उपस्थिती सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत भद्रकाळात राखी बांधू नये. भद्रकाळ हा विनाशकारी काळ मानला जातो. म्हणूनच याला अशुभ म्हटले जाते.

भद्राकाळात राखी का बांधू नये, जाणून घ्या यामागील आख्यायिका

आख्यायिकेनुसार त्रेतायुगात रावणाने आपल्या बहिणीकडून भद्रा काळात राखी बांधून घेतली होती. यानंतर त्याच्या विनाशाला सुरुवात झाली होती आणि अखेर प्रभू श्रीरामांनी त्याचा वध करुन त्याला संपवलं होतं. त्यामुळे भद्रा काळात कोणतीही बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही.

राहू काळ कधी?

तर, राहू काळ संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 39 मिनिटांपर्यंत असेल. राहू काळातील कोणतेही काम यशस्वी होत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणून, राखी बांधण्याचे कामही राहु काळच्या वेळी करु नये. भद्रा आणि राहु काळ दोन्ही अशुभ मुहूर्त मानले जातात.

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

❇️ पौर्णिमा तिथी – 21 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 07 वाजेपासून ते 22 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

❇️ पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 06 वाजून 15 मिनिटांपासून ते संध्याकाळी 05 वाजून 31 मिनिटांपर्यंत

❇️ राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त – दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 04 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील

अशा प्रकारे राखीचं ताट सजवा

? सर्वप्रथम एका ताटात कुंकू, अक्षता, राखी, दिवा आणि मिठाई ठेवा.

? यानंतर भावाला टिळा लावून अक्षता लावा.

? यानंतर भावाची आरती ओळावा.

? त्यानंतर त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा.

? यानंतर, त्याची पुन्हा आरती ओवाळा आणि त्याला मिष्ठान्न खाऊ घाला.

? लहान भावाला आशीर्वाद द्या आणि मोठ्या भावाकडून आशीर्वाद घ्या.

? भावांनी त्यांच्या क्षमतेनुसार बहिणीला भेटवस्तू द्यावी.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Astro rules for gift : चुकूनही कुणाला देऊ नका या गोष्टी, भेटवस्तू देताना या गोष्टींची घ्या काळजी

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त