Raksha Bandhan 2021 | भाऊ-बहिणीतील वितुष्ट दूर करायचे असल्यास रक्षाबंधनच्या दिवशी हे उपाय करा

| Updated on: Aug 21, 2021 | 11:01 AM

रक्षाबंधनचा सण हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणीचे नाते दृढ करण्याचा सण आहे. या दिवशी, बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दृढ आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना करते, तर त्या बदल्यात भाऊ तिच्या सुख-दुःखात तिला साथ देण्याचे वचन देतो.

Raksha Bandhan 2021 | भाऊ-बहिणीतील वितुष्ट दूर करायचे असल्यास रक्षाबंधनच्या दिवशी हे उपाय करा
Raksha-Bandhan-2021
Follow us on

मुंबई : रक्षाबंधनचा सण हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणीचे नाते दृढ करण्याचा सण आहे. या दिवशी, बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दृढ आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना करते, तर त्या बदल्यात भाऊ तिच्या सुख-दुःखात तिला साथ देण्याचे वचन देतो.

यावेळी रक्षाबंधनाला शुभ योग येत आहेत. या दिवशी धनिष्ठा नक्षत्र आणि शोभन योग आहे. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:34 पर्यंत शोभन योग आणि संध्याकाळी 07:40 पर्यंत धनिष्ठ नक्षत्र आहे. हे भाऊ-बहीण दोघांसाठीही खूप शुभ सिद्ध होईल. या दिवशी काही उपाय करणे देखील खूप शुभ ठरेल. जर तुमच्या आणि तुमच्या भावामध्ये काही मतभेद असतील तर हे उपाय करुन त्या समस्या तुम्ही दूर करु शकता आणि याने नातेसंबंध अधिक गोड होईल.

1. जर तुमचा भाऊ तुमच्यावर एखाद्या गोष्टीवर रागावला असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी एका पाटावर लाल कापड घालून त्यावर भावाचे चित्र ठेवा. यानंतर, सव्वा किलो जव, 125 ग्रॅम साखर, 125 ग्रॅम चण्याची डाळ, 21 हिरवी वेलची, 21 हिरवी मनुका, 21 बताशे, 5 कापराच्या वड्या आणि लाल कपड्यात 11 किंवा 21 रुपये बांधा. हा गठ्ठा हातात धरुन, देवाचे चिंतन करताना भावासोबतचे मतभेद दूर करण्याची प्रार्थना करा आणि भावाच्या चित्रावर हा गठ्ठा 11 वेळा उलटा फिरवा. यानंतर हा गठ्ठा मंदिरातील शिवलिंगाजवळ ठेवा. हा उपाय केल्याने तुमचे आणि तुमच्या भावाचे नाते पुन्हा सुधारेल.

2. जर तुमचे मन कोणत्याही कारणामुळे अस्वस्थ असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा कच्च्या दुधात तांदूळ आणि साखर मिसळून चंद्राला अर्घ्य द्या. यानंतर, “ओम स्रां स्रीं स्रौं स: चन्द्रमसे नम:” या मंत्राचा जप करा. चंद्र पौर्णिमेचा देव मानला जातो. असे केल्याने तुमचा ताण कमी होतो आणि मन शांत होते.

3. जर तुमचा भाऊ काही अडचणीत असेल आणि त्याला संकटातून बाहेर काढायचा असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुरटी घ्या आणि भावावरुन सात वेळा उतरवून घ्या. यानंतर, ती तुरटी स्टोव्हमध्ये जाळून टाका किंवा चौकात फेकून द्या. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका.

4. भावाची आर्थिक स्थिती मजबूत नसल्यास रक्षाबंधनाच्या दिवशी अक्षता, सुपारी आणि एक रुपयाचे नाणे गुलाबी कपड्यात ठेवा. ते देवी लक्ष्मी आणि नारायण यांच्या समोर ठेवा आणि भावाचा त्रास दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा. यानंतर, ते भावाला द्या आणि त्याला हे तिजोरीत ठेवण्यास सांगा. काही काळातच प्रगती दिसून येईल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ-बहिणीने हे उपाय करावे, दूर होतील सर्व समस्या

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनला या अशुभ मुहूर्तावर चुकूनही भावाला राखी बांधू नका, जाणून घ्या शुभ आणि अशुभ मुहूर्त कोणता?