Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनच्या दिवशी या देवांना बांधा राखी, पूर्ण होतील सर्व इच्छा

| Updated on: Aug 16, 2021 | 1:06 PM

बरेच लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना आणि झाडे आणि वनस्पतींना राखी बांधतात. त्याचबरोबर काही लोक रक्षाबंधनाच्या दिवशी देवालाही राखी बांधतात. असा विश्वास आहे की या विशेष दिवशी देवाला राखी बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कोणत्या देवाला राखी बांधली पाहिजे हे जाणून घ्या

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनच्या दिवशी या देवांना बांधा राखी, पूर्ण होतील सर्व इच्छा
rakshabandhan
Follow us on

मुंबई : रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यावेळी रक्षाबंधनचा सण 22 ऑगस्ट 2021 रोजी साजरा केला जाईल. भाऊ आणि बहिणींसाठी हा दिवस खूप खास असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असणार नाही. यामुळे बहिणी दिवसभर भावांना राखी बांधू शकतात.

हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार 21 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांपासून ते 22 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजून 1 मिनिटांपर्यंत असेल. यावेळी राखीच्या दिवशी भद्रा काळ असणार नाही. पंचांगानुसार, 23 ऑगस्ट 2021 रोजी भद्रा काळाची वेळ सकाळी 05:34 ते 06.12 पर्यंत असेल. राखी बांधण्यासाठी शुभ वेळ ही सकाळी 06:15 ते 10:35 पर्यंत असेल.

या विशेष दिवशी, बरेच लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना आणि झाडे आणि वनस्पतींना राखी बांधतात. त्याचबरोबर काही लोक रक्षाबंधनाच्या दिवशी देवालाही राखी बांधतात. असा विश्वास आहे की या विशेष दिवशी देवाला राखी बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कोणत्या देवाला राखी बांधली पाहिजे हे जाणून घ्या –

भगवान श्रीगणेश

भगवान श्रीगणेशाला हिंदू धर्मात प्रथम पूजनिय देवता मानली जाते. गणपतीला लाल रंग खूप आवडतो. म्हणूनच असे मानले जाते की त्यांना लाल रंगाची राखी बांधल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते.

भगवान शिव

श्रावण महिना हा भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात येतो. मान्यता आहे की या दिवशी भगवान शिव यांना राखी बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

हनुमान जी

रक्षाबंधनाच्या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे. असे मानले जाते की राखी बांधल्याने कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होतो आणि शक्ती-बुद्धी प्राप्त होते.

श्रीकृष्ण

भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. यामुळे जेव्हा दुश्शासनाने द्रौपदीचे चीरहरण केले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले होते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला राखी बांधल्याने ते प्रत्येक परिस्थितीत तुमचे रक्षण करतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shravan Somvar 2021 | आज दुसरा श्रावणी सोमवार, जाणून घ्या आज महादेवांना कुठली शिवामूठ वाहावी

5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग भीमाशंकर, जिथे महादेवांनी त्रिपुरासुकराचा वध केला, जाणून घ्या या देवस्थानाची माहिती