मुंबई : देशभरात आज आणि उद्या रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2023) सण साजरा केला जाणार आहे. बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची आणि प्रगतीची कामना करते. यावेळी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच आज बुधादित्य, षष्ठ आणि वासरपती योग तयार होत आहेत. या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त रात्री 9.2 नंतर आहे, भद्रा असल्याने त्यापूर्वी राखी बांधली जाणार नाही. 31 ऑगस्टला राखी बांधण्याची वेळ फक्त सकाळी 7.05 पर्यंत आहे. यानंतर श्रावण पौर्णिमेची तिथी समाप्त होईल. भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त निवडण्यासोबतच शुभ मंत्राचे पठणही खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून भावा-बहिणीचे प्रेम सदैव टिकून राहते आणि भावाचे आयुष्यही वाढते.
तेन त्वाम् प्रतिबद्धनामि, रक्षे माचल माचल:।
या मंत्राचा अर्थ असा आहे की मी तुझ्या मनगटावर हा पवित्र धागा बांधत आहे जो राजा बळीच्या रक्षणासाठी बांधला होता. जे तुम्हाला सर्व संकटांपासून वाचवेल. भावानेही बहिणीला प्रत्येक संकटात साथ देण्याचे वचन दिले पाहिजे बहिणीने रक्षाबंधनाला बांधल्यानंतर भावानेही वचन द्यावे की मी बहिणीला तिच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात साथ देईन आणि बहिणीचे सदैव रक्षण करीन.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)