Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला 4 शुभ योगायोग, राखी बांधण्यासाठी इतकेच तास शुभ

| Updated on: Aug 18, 2024 | 1:20 PM

Raksha Bandhan 2024: Raksha Bandhan 2024: कोणत्या वेळेत भावाच्या मनगटावर राखी बांधणं ठरेल शुभ? यंदाच्या वर्षी 4 शुभ योग पण..., हिंदू पंचागानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला 4 शुभ योगायोग, राखी बांधण्यासाठी इतकेच तास शुभ
Follow us on

Raksha Bandhan 2024: भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सोहळा अशी ओळख असलेला रक्षाबंधनाचा सणाची प्रतीक्षा प्रत्येकाला असते. यंदाच्या वर्षी 19 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात रक्षाबंधन हा सण साजरा होणार आहे. हिंदू पंचागानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्याकडून त्यांचे रक्षण करण्याचे वचन घेतात. यावेळी रक्षाबंधनाचा सण उद्या 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.

यंदाच्या वर्षी सावन पौर्णिमा तिथी 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:04 वाजता सुरू होईल आणि रात्री 11:55 वाजता समाप्त होईल. सांगायचं झालं तर यंदाच्या वर्षी रक्षाबंधन भद्राच्या प्रभावाखाली असेल. ज्योतिषांच्या मते, भाद्र काळात शुभ कार्य करणे टाळावे, त्यामुळे या काळात राखी बांधू नये. याशिवाय या वर्षी रक्षाबंधनाचा सण चार शुभ योगांमध्ये साजरा होणार असल्याची माहिती ज्योतिषांनी दिली आहे.

राखी बांधण्यासाठी शुभ-मुहूर्त…

रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्यासाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. यापैकी कोणत्याही शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाच्या मनगटावर राखी बांधू शकता. ज्यामुळे भावाची प्रगती देखील होईल. रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा पहिला शुभ मुहूर्त दुपारी 01:46 ते 04:19 पर्यंत असेल. म्हणजेच तुम्हाला राखी बांधण्यासाठी 2 तास 33 मिनिटे मिळतील.

दुसऱ्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचं झालं तर, प्रदोष काळात तुम्ही संध्याकाळी तुमच्या भावाच्या मनगटावर राखी बांधू शकता. या दिवशी संध्याकाळी 06:56 ते 09:07 पर्यंत प्रदोष काळ असेल. या वेळेत देखील राखी बांधणं शुभ असणार आहे.

रक्षाबंधनाला 4 शुभ योगायोग

यंदाच्या रक्षाबंधनला एक नाही तर, 4 शुभ योगायोग आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग, रवि योग आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग पहाटे 5:53 ते 8:10 पर्यंत राहील. याशिवाय शोभन योग 19 ऑगस्ट रोजी पहाटे 04:28 वाजता सुरू होईल आणि 20 ऑगस्ट रोजी सकाळी 12:47 वाजता समाप्त होईल. मात्र, भाद्रामुळे या शुभ योगांमध्ये राखी बांधता येणार नाही.

रक्षाबंधन पूजा विधी (Raksha Bandhan Pujan Vidhi)

रक्षाबंधन हा सण भाऊ – बहिणीच्या नात्यातील प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि रक्षा करण्याचं वचन घेते. भावाला ओवाळते आणि त्याला टिळा लावते. बहीण ताटात दिवा लावल्यानंतर भावाची आरती करते. त्यानंतर मिठाई खाऊन भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येवो यासाठी देवाकडे प्रार्थना करते. त्या बदल्यात, भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.