Ram Mandir : राम मंदिरात प्रवेश करताना अशी असणार सुरक्षा व्यावस्था, या वस्तू आत नेण्यास मनाई

| Updated on: Jan 16, 2024 | 8:20 AM

22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक कार्यक्रमात फक्त तेच लोक सहभागी होऊ शकतात, ज्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्र मिळाले आहे. निमंत्रणाशिवाय येथे येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जबरदस्तीने प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते.

Ram Mandir : राम मंदिरात प्रवेश करताना अशी असणार सुरक्षा व्यावस्था, या वस्तू आत नेण्यास मनाई
राम मंदिर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत (Ayodhya) प्रभू रामाच्या बालरूप रामललाचा अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील हजारो लोकं अयोध्येला पोहोचणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिर प्रवेशाबाबत एंट्री अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे, त्यामुळे तुम्हीही रामललाच्या दर्शनासाठी येत असाल तर तुम्हाला या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अन्यथा दर्शनाशिवाय परतावे लागेल. काय आहेत हे नियम जाणून घेऊया.

अन्नपदार्थ आत नेण्यास मनाई

मंदिराच्या आवारात तुम्ही अन्नपदार्थ सोबत नेऊ शकत नाही. मग ते घरचे बनवलेले अन्न असो किंवा बाहेरचे पॅक केलेले अन्न.

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे

मंदिरात अभिषेक करताना तुम्ही कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत नेऊ शकत नाही. मोबाईलपासून ते इलेक्ट्रॉनिक घड्याळ, इअरफोन, लॅपटॉप किंवा कॅमेरा या सर्व गोष्टींवर बंदी आहे.

हे सुद्धा वाचा

बेल्ट आणि शूज संबंधित नियम

22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान बेल्ट, चपला वगैरे घालून मंदिराच्या आवारात प्रवेश करता येणार नाही. तसेच पर्स मंदिराच्या आत नेता येत नाही.

पूजा थाळी घेऊ नका

पूजा थाळीशिवाय मंदिरात क्वचितच लोक येत असत, परंतु सध्या तुम्ही पूजा साहित्य आणि थाळी घेऊन येथे येऊ नका, कारण या काळात पूजा करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

निमंत्रण पत्र असलेल्यांनाच प्रवेश मिळेल

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 22 जानेवारीला होणाऱ्या अभिषेक कार्यक्रमात फक्त तेच लोक सहभागी होऊ शकतात, ज्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्र मिळाले आहे. निमंत्रणाशिवाय येथे येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जबरदस्तीने प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई होऊ शकते.

कपड्यांचे नियम

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात भारतीय पारंपारिक कपडे परिधान करूनच लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर परिसराने कोणताही विशिष्ट ड्रेस कोड नमूद केलेला नसला तरी, भारतीय पारंपारिक पोशाख परिधान करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.