मुंबई : नवरात्र संपली, आता दिवाळीचा उत्साह आहे. पुढच्या पंधरा दिवसांनी दिवाळीचा आठवडा सुरु होईल. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरात साफसफाई करायला देखील सुरुवात केली असेल. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण घराला नव्याने रंग देतात. पण घरात साफसफाई करताना घरातील काही वस्तू राहून जातात. ते आपल्या लक्षात येत नाही. पण त्या वस्तू जर घरातून बाहेर काढल्या नाहीत तर त्यामुळे भविष्यात आपलं नुकसान होतं. घरात काही अशुभ वस्तू राहिल्यास घरात लक्ष्मी थांबत नाही. घरातील सदस्यांना नेहमी पैशांची कमतरता जाणवते. मग अशाच काही वस्तूंची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
घराच्या भिंतीवर असूद्या किंवा हाताच्या मनगटांवर, घरात बंद घड्याळ असणं हे वास्तूशास्त्रात अशुभ मानलं जातं. घड्याळला सुख आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. जर आपल्या घरातदेखील कोणत्याही भिंतीवर तुटलेली घड्याळ किंवा बंद पडलेली घड्याळ असेल तर तिला दिवाळीआधी घराबाहेर फेकून द्या. नाहीतर त्याचे दुष्प्रभाव तुमच्यावरही पडू शकतो.
घरात कधीही देवाची तुटलेली मूर्ती ठेवू नये. विशेष म्हणजे फक्त दिवाळीच्या काळातच नाही तर नेहमी घरात देवाच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नये. कारण ते अपशकून मानलं जातं. जर तुमच्या घरात देवाची तुटलेली मूर्ती असेल तर त्या मूर्तीचं दिवाळीआधी विसर्जन करा आणि नवी मूर्ती घरातील मंदिरात स्थापित करा.
या दिवाळीआधी साफसफाई करताना घरात तुटलेलं फर्निचर आढळल्यास त्या फर्निचरला घराबाहेर करा किंवा विकून द्या. घरात तुटलेली खुर्ची, टेबल ठेवू नये. चांगले फर्निचरच घरात ठेवावे. वास्तूशास्त्रानुसार मोडक्यातोडक्या फर्निचरचा घरावर नकारात्मक प्रभाव पडतो.
घरात तुटलेला काच तर अजिबात ठेवू नका. तुमच्या घरात खिडकीचा, कपाटीचा किंवा आरशाचा काच तुटलेला असेल तर त्याला ताबडतोब घराबाहेर काढा. कारण घरात तुटलेला काच ठेवू नये, असं बोललं जातं. कारण तुटलेल्या काचेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, असं मानलं जातं.
घराच्या स्वयंपाक घरात कधीही तुटलेले भांडे ठेवू नये. या दिवाळीपूर्वी साफसफाई करताना स्वयंपाक घरातील तुटलेले भांडे बाहेर फेकून द्या. तुटलेल्या भांड्यांना घरात ठेवणं अशुभ मानलं जातं.
घरातील विजेचे उपकरणं खराब झाले असतील तर ते दिवाळीआधी लवकरता लवकर चांगली करा. कारण दिवाळी सण लखलखात आणि तेजोमयचा प्रतिक मानला जातो. अशावेळी घरातील ट्यूबलाईट, बल्ब सुरु असायला हवेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये अंधाऱ्याला अशुभ मानलं जातं. त्याचा आपल्या प्रकृतीवरही परिणाम पडतो.
हेही वाचा :
‘या’ 3 राशीचे लोक असतात नेहमी जोखीम पत्करणारे, जाणून घ्या याबाबत सर्वकाही
Vastu tips for wall colour : या दिवाळीत वास्तुनुसार तुमच्या घराच्या भिंतींसाठी निवडा रंग