मुंबई : आज संकष्ट चतुर्थी (Sankashta Chaturthi 2023) आहे. वर्षभरात 12 संकष्टी चतुर्थी येतात. सध्या कार्तिक महिना सुरू आहे, देवाच्या भक्तीसाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात गणाधिप संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची परंपरा आहे. स्कंद पुराणानुसार या तिथीला गणेशाच्या विशेष उपासनेसह उपवास केल्याने अडचणी दूर होतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये लाभ होतो. संकष्टी चतुर्थी या नावाप्रमाणेच साधकाच्या सर्व संकटांचा नाश करणारी मानली जाते. या वर्षी 2023 च्या कार्तिक महिन्यातील गणाधिप संकष्टी चतुर्थीची तारीख, पूजा शुभ वेळ आणि चंद्रोदय वेळ जाणून घेऊया.
कार्तिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी 30 नोव्हेंबर 2023, गुरुवारी आहे. या दिवशी सूर्योदयाने व्रत सुरू होते, सायंकाळी गणपतीची पूजा करून रात्री चंद्रदेवाची पूजा करून त्याला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडतात.
पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील गणाधिप संकष्टी चतुर्थी तिथी 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02:24 वाजता सुरू होईल आणि 1 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 03:31 वाजता समाप्त होईल.
गणपती पूजा मुहूर्त – सकाळी 06.55 ते 08.13
संध्याकाळची वेळ – 04.05 pm – 07.05 pm
चंद्राला अर्घ्य दिल्यावरच संकष्टी चतुर्थीचे व्रत सफल होते. कार्तिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 07.54 मिनिटांनी चंद्रोदय होईल. चंद्राची उपासना केल्याने मानसिक शांती मिळते. चंद्र दोष दूर होतो.
विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि सौभाग्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करतात. या व्रताचा महिमा आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत करतो तसेच संतती होण्यासाठी या व्रताचे खूप महत्त्व आहे. अविवाहित मुली देखील चांगला पती मिळावा म्हणून दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी गणपतीची पूजा करतात. हे व्रत सर्व संकट दूर करणारे मानले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)