Sankashti Chaturthi 2022 | संकटातून मुक्तता मिळण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करा

| Updated on: Apr 19, 2022 | 7:00 AM

 संस्कृत (Sanskrit)मध्ये संकष्टीचा अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो. संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते.

Sankashti Chaturthi 2022 | संकटातून मुक्तता मिळण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रत करा
Ganesha
Follow us on

मुंबई : संस्कृत (Sanskrit)मध्ये संकष्टीचा अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो. संकष्टी चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते. म्हणून हा दिवस खूप खास मानला जातो. सर्व चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. प्रत्येक महिन्यात २ चतुर्थी असतात. यातील एक कृष्ण पक्षात आणि दुसरा शुक्ल पक्षात येतो. यामध्ये कृष्ण पक्षाची चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. आज १९ एप्रिलला वैशाख महिन्याची चतुर्थी आहे. या दिवशी संकष्टी श्री गणेश चतुर्थी व्रत ठेवण्यात येणार आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि उपासना करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच संकष्टी चतुर्थीची पूजा शुभ मुहूर्तात करून चंद्राला अर्घ्य द्यावे. याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.

संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त एप्रिल 2022 पूजा मुहूर्त
चतुर्थी तिथी मंगळवार, 19 एप्रिल रोजी दुपारी 04:38 पासून सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी दुपारी 01:52 पर्यंत चालेल. चतुर्थीच्या उपवासात चंद्राला अर्घ्य देणे आवश्यक असल्याने चतुर्थी ज्या दिवशी रात्री येते त्याच दिवशी मानले जाते. यावेळी संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 09:50 आहे.

संकष्टी चतुर्थीला हे काम करू नका
गणेशाला चुकूनही तुळशी अर्पण करू नका. असे करणे अशुभ मानले जाते.
प्राणी आणि पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नये, परंतु संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असे करणे खूप जड जाऊ शकते. त्यापेक्षा या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांना अन्न आणि पाणी देण्याचा प्रयत्न करा.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्येष्ठांचा आणि ब्राह्मणांचा अपमान करण्याची चूक करू नका. यामुळे श्रीगणेश तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

पौराणिक कथा
पद्म पुराणानुसार हे व्रत भगवान गणेशाने स्वतः माता पार्वतीला सांगितले होते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात, परंतु माघ महिन्याच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी नित्य व्रत केल्याने बुद्धी, रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते, तसेच सर्व बाधा, अडथळे नष्ट होतात. या दिवशी भगवान श्री गणेशजींचा जन्म झाल्यामुळे या दिवसाला विषेश महत्त्व आहे.

संबंधीत बातम्या

Sunday Remedies: रविवारी करा ‘हे’ उपाय; जाणवणार नाही पैशांची कमतरता

Jyotish tips: सुख म्हणजे नक्की काय असतं?, चार गोष्टी टाळल्या की ते घर बसल्या मिळतं!

केशरशी संबंधित हे उपाय करा, समस्या तर दूर होतीलच पण आयुष्य ‘धन’ धनाधन धन होईल!