हिंदू धर्मामध्ये सण, उत्साहाला फार महत्त्व आहे. आज अनंत चतुर्दशी म्हणजे लाडक्या बाप्पा निरोप देण्याचा दिवस. 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर भक्त आज गणरायचं विसर्जन करतील. अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या काळात पितरांच्या नावाने श्राद्ध, पिंड दान करण्याची परंपरा आहे. पितृ पक्षासोबतच या आठवड्यात विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाच्या चतुर्थी तिथीलाही उपवास केला जातो. सांगायचं झालं तर, हा आठवडा फार महत्त्वाचा आहे. सप्टेंबरच्या या आठवड्यातील प्रमुख उपवास सणांबद्दल जाणून घेऊया…
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी असते. असं मानलं जातं, की या दिवशी विधीपूर्वक श्री हरीची पूजा केल्यास 14 वर्षांपर्यंत अनंत फळ मिळते. पंचांगानुसार, पांडवांनी भगवान कृष्णाच्या प्रेरणेने अनंत चतुर्दशीचे व्रत केले होते आणि ज्यामुळे त्यांना गमावलेले राज्य देखील परत मिळालं.. असं मानलं जातं.
अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीला श्राद्ध केले जाते. प्रतिपदा तिथीला आपल्या पितरांच्या उद्धारासाठी आणि समाधानासाठी, पितृदोषापासून मुक्तीसाठी प्रतिपदा श्राद्ध करण्याची प्रथा आहे. प्रत्येक मनुष्यावर तीन प्रकारचे ऋण असतात, पहिले देवाचे ऋण, दुसरे ऋषींचे ऋण, तिसरे पितृ ऋण. पितृपक्षात श्राद्ध केल्याने व्यक्तीला तीन ऋणांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतं.
या दिवशी अश्विन कृष्ण पक्षाच्या द्वितीय तिथीला श्राद्ध केलं जातं… असं म्हणतात. ज्या व्यक्तींचा मृत्या ज्या तिथीला झाला आहे. त्याच तिथीला श्राद्ध करावं… अशी देखील मान्यता आहे. द्वितीया तिथीच्या श्राद्धाला दूज श्राद्ध असेही म्हणतात. पितृ पक्षाचा काळ पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
हिंदू पंचांगानुसार, अश्विन कृष्ण पक्ष तृतीया तिथीला श्राद्ध केलं जातं. योगायोगाने पंचक देखील याच 20 सप्टेंबर रोजी 9:26 वाजता समाप्त होईल. शास्त्रानुसार देवतांना प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने प्रथम आपल्या पितरांना प्रसन्न केले पाहिजे. असे केल्याने देवांचा आशीर्वाद राहतो आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते… असं देखील म्हणतात.