मुंबई : हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस देवाला समर्पित मानला जातो. शनिवार हा भगवान शनिदेव (Lord Shanidev) यांना समर्पित असतो. शनिदेव यांना कर्म फळ देणारा देव म्हणतात. मान्यता आहे की, जो शनिदेवांना प्रसन्न करेल, त्याला ते रंक ते राजा बनवतात, पण जर ते रागावले तर एखाद्याला राजा ते रंकही बनवतात.
तुमच्या जीवनात शनिशी संबंधित काही समस्या असल्यास शनिवारी व्रत ठेवावे. जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण भक्तीभावाने शनिदेवाचे व्रत केले आणि त्यांची पूजा केली तर शनिदेव त्याचे दुःख दूर करतात. येथे जाणून घ्या शनिवारी करावयाच्या या व्रताचे महत्त्व आणि पद्धत.
उपवासाची पद्धत
जर तुम्हाला हे व्रत ठेवायचे असेल तर शुक्ल पक्षातील कोणत्याही शनिवारपासून हे व्रत सुरू करा. सकाळी लवकर उठल्यानंतर, नित्यकर्म आणि आंघोळीनंतर उपवासाचे व्रत करावे. यानंतर शनिदेवाची मूर्ती ठेवा. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर शनिदेवाला पंचामृताने स्नान घालावे आणि ही मूर्ती तांदळाच्या 24 दल कमळावर बसवावी.
यानंतर शनिदेवाला काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल, उदबत्ती, दिवा इत्यादी अर्पण करा. त्यांच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. शनिदेवाला गोड पुरी आणि काळी उडीद डाळ खिचडी अर्पण करा. मग शनिदेवाची कथा वाचा. मंत्रांचा जप करा आणि शेवटी आरती करा. यानंतर शनिदेवाकडे आपल्या चुकांची माफी मागावी.
महत्त्व –
शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी उपवास करणे खूप फायदेशीर मानले जाते. नोकरी-व्यवसायात यश मिळते आणि जीवनात सदैव सुख, समृद्धी आणि सन्मान मिळतो. माणसाचे आयुष्य रोगमुक्त होऊन आयुष्य वाढते. याशिवाय कठोर परिश्रम, शिस्त, निर्णय क्षमता वाढते.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Astro Tips : जाणून घ्या घरात शंख ठेवण्याचे अनेक फायदे, वाचा अधिक!
Kalashtami December 2021: पौष महिन्याची कालाष्टमी कधी? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या!