मुंबई : श्रावणाचा (Sawan) शेवटचा आणि चौथा सोमवार (Somwar) आज आहे. महादेवाचा (Mahadeo) लाडका श्रावण महिना आता संपुष्टात आला आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी सावन संपेल आणि भाद्रपद महिना सुरू होईल. भोलेनाथाच्या भक्तीसाठी सावन सोमवार हा अतिशय उत्तम मानला जातो. या दिवशी व्रत ठेऊन खऱ्या मनाने रुद्राभिषेक केल्यास सर्व सुख प्राप्त होते असे मानले जाते. रुद्राभिषेक म्हणजे भगवान रुद्राचा अभिषेक म्हणजेच मंत्राने शिवलिंगाचा अभिषेक, श्रावणामध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक करता येत नसेल, तर श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी रुद्राभिषेक करून भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्याची संधी आहे. सोमवारी शिवाचा रुद्राभिषेक केल्याने सर्व रोगांचा नाश होतो आणि ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. श्रावणाचा शेवटचा सोमवार खूप खास असतो कारण या दिवशी अनेक योगायोग घडतात. पूजेची शुभ वेळ आणि पद्धत जाणून घेऊया.
श्रावणाच्या चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी एकादशी आणि रवि योग तयार होत आहेत. या दिवशी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पवित्र एकादशी देखील आहे. श्रावण पवित्र एकादशीला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. दुसरीकडे, रवि योगात शिव-विष्णूची उपासना खूप फायदेशीर मानली जाते. रवियोग इतका प्रभावी आहे की त्यामध्ये देवी-देवतांची पूजा केल्याने समृद्धी वाढते. सत्कर्म सफल होतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)