मुंबई : प्रदोष व्रताचे हिंदू धर्मात खूप महत्वाचे आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत शनिवारी पडत आहे, म्हणून त्याला शनि प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
शनिवारी पडत असल्याने शंकरासोबत शनिदेवाची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि दोष किंवा शनि साढे साती असेल तर त्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिव यांची पूजा केल्यास शनिच्या साढे सातीपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. प्रदोष व्रताशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया –
प्रदोष व्रताच्या दिवशी शंकर आणि देवी पार्वतीची पूजा प्रदोष काळात केली जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्यास तुमचे सर्व त्रास आणि दुःख दूर होतात. यावेळी त्रयोदशी तिथी 04 सप्टेंबर 2021 रोजी शनिवारी सकाळी 08:24 वाजता सुरु होईल आणि रविवारी 05 सप्टेंबर रोजी सकाळी 08:21 वाजता संपेल.
त्रयोदशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे आणि व्रत आणि उपवास करण्याचे व्रत घ्यावे. यानंतर, शिव मंदिरात जावे आणि बेलपत्र, कणेर, धतुरा, तांदूळ, फुले, धूप, दिवा, पान आणि सुपारी भगवान शिव यांना अर्पण करा. यानंतर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावा आणि शिव चालीसाचे पठण करा.
– जर तुमच्या कुंडलीत शनि दोषाची समस्या सुरु असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शनि स्तोत्राचे पठण करा.
– याशिवाय शनि मंत्रांचा जप करावा.
– शनि प्रदोषच्या दिवशी बुंदीचे लाडू अर्पण करावे आणि ते काळ्या गाईला खायला द्या.
Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थीला घरी गणेशाची स्थापना का केली जाते, जाणून घ्या यामागील पौराणिक कथाhttps://t.co/dQblNqiRtf#GaneshaChaturthi2021 #LordShreeGanesha #GanpatiBappa
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Ganesh Chaturthi 2021 | गणेशोत्सव कधीपासून, जाणून घ्या गणेश स्थापना आणि पूजेचे नियम
Chanakya Niti | या समस्यांना लहानसहान लेखून दुर्लक्ष केले तर विनाशाला द्याल आमंत्रण