Shaniwar Upay : शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी करा हे 11 सोपे उपाय, होतील सर्व समस्या दुर

| Updated on: Mar 18, 2023 | 8:44 AM

असे म्हणतात की शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच त्याला न्यायदेवता आणि कर्माचा दाता म्हणतात.

Shaniwar Upay : शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी करा हे 11 सोपे उपाय, होतील सर्व समस्या दुर
शनिदेव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी शनिदशा नक्कीच येते. असे म्हणतात की शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच त्याला न्यायदेवता आणि कर्माचा दाता म्हणतात. जर कुंडलीत शनि बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात खूप यश मिळते. दुसरीकडे शनि कमजोर असेल तर व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत शनिदेवाशी संबंधित काही उपाय (Shaniwar Upay) केल्यास शुभफल प्राप्त होते. चला जाणून घेऊया शनिदेवाचे कोणते उपाय आहेत, जे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतील.

शनिदेवाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी करा हे उपाय

  1. दर शनिवारी शनिदेवाची पूजा विधीपूर्वक करा. असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
  2. शनिवारी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यासोबत दूध अर्पण करावे.
  3. शनिवारी 19 हात लांब काळा धागा बांधून हार बनवा आणि नंतर तो गळ्यात घाला. असे केल्याने शनिदेवाचे अशुभ प्रभाव शांत होतात.
  4. शुक्रवारी रात्री काळे हरभरे पाण्यात भिजवावे. त्यानंतर हे हरभरे, कच्चा कोळसा आणि लोखंडाचा तुकडा  काळ्या कपड्यात बांधून शनिवारी तलावात किंवा नदीत टाका. एक वर्ष दर शनिवारी हा उपाय करा. असे केल्याने शनीचा त्रास कमी होतो.
  5. शनिवारी पितळेच्या भांड्यात तिळाचे तेल भरावे. त्यानंतर त्यामध्ये तुमचे प्रतिबिंब पाहून तेल दान करा.
  6. शनीची महादशा, साडेसाती किंवा अडिचकीपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावावा. यानंतर पिंपळाच्या झाडाची किमान तीन वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
  7. शनिदेवाला बळ देण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी. ही अंगठी घोड्याच्या नालीपासून बनलेली असावी हे लक्षात ठेवा.
  8. शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करावे.
  9. शनिवारी  नियमितपणे कावळ्यांना धान्य खाऊ घाला.
  10. गरजूंना मदत करा, शनिशी संबंधित वस्तू दान करा.
  11. शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)