मुंबई : 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र 2021 (Shardiya Navratri 2021) अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरु झाली आहे. यावेळी नवरात्री आठ दिवसांची आहे. नवरात्रोत्सवात मातेच्या विविध 9 रुपांची पूजा केली जाते. देवीच्या नऊ रुपे आणि त्यामागील रहस्य खालीलप्रमाणे आहेत –
1. शैलपुत्री :
देवी पार्वती शैलपुत्री म्हणून ओळखली जाते. शैलचा शब्दशः अर्थ पर्वत आहे. पर्वतराज हिमालयच्या घरी मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिला शैलपुत्री म्हटले गेले.
2. ब्रह्मचारिणी :
ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या, कठोर तप करणारी देवी म्हणून देवीला ब्रह्मचारिणी हे नाव पडले. भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी देवी पार्वती यांनी वर्षानुवर्षे कठोर तप केले. म्हणून त्यांना ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले.
3. चंद्रघंटा :
अर्धचंद्राच्या आकाराचे टिळा देवीच्या मस्तकावर विराजमान आहे, म्हणूनच तिला चंद्रघंटा असे नाव पडले.
4. कुष्मांडा :
देवीमध्ये विश्वाची निर्मिती करण्याची शक्ती आहे आणि ती उदरापासून अंडापर्यंत विश्वाचा अंतर्भाव करते, म्हणून देवीला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते.
5. स्कंदमाता :
माता पार्वती कार्तिकेयाची आई आहे. स्कंद हे कार्तिकेयाचे एक नाव आहे. अशा प्रकारे स्कंदच्या आईला स्कंदमाता म्हणतात.
6. कात्यायिनी :
जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला होता, तेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी आपापल्या तेजाचा अंश देऊन महिषासुरांचा नाश करण्यासाठी एक देवी निर्माण केली. या देवीची प्रथम पूजा महर्षी कात्यायन यांनी केली होती. म्हणून तिला कात्यायनी म्हणून ओळखले जाऊ लागले.
7. कालरात्री :
देवी भगवतीचे सातवे रुप कालरात्री म्हणून ओळखले. काळ म्हणजे संकट, जिच्यात प्रत्येक प्रकारच्या संकटाला संपवण्याची शक्ती असते ती देवी म्हणजे कालरात्री. देवी कालरात्रीचे रुप दिसाला खूप भयंकर आहे, परंतु ती नेहमी शुभ परिणाम देणारी आहे आणि ती राक्षसांचा वध करणारी आहे. मातेच्या या रुपाची पूजा केल्याने सर्व त्रास नष्ट होतात.
8. महागौरी :
जेव्हा देवीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी कठीण तपश्चर्या केली होती की तेव्हा ती काळी पडली होती. महादेव तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हा भोलेनाथने तिचे शरीर गंगाजीच्या पवित्र पाण्याने धुतले. यानंतर, देवीचे शरीर विद्युत प्रकाशासारखे खूप तेजस्वी झाले होते. तिचे हे रुप महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले.
9. सिद्धिदात्री :
तिला सिद्धिदात्री म्हटले जाते कारण ती तिच्या भक्तांना सर्व सिद्धी देणारी देवी आहे. असे मानले जाते की त्यांची पूजा करणे म्हणजे इतर सर्व देवींची पूजा करण्यासारखं असते आणि भक्ताची सर्वात कठीण कामे देखील सुलभ होतात.
Shardiya Navratri 2021 : नवरात्रीत कांदा-लसूण का खाल्ले जात नाही, जाणून घ्याhttps://t.co/sgrB2Vs3Cg#ShardiyaNavratri2021 #navratri2021 #Durgamata
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shardiya Navratri 2021 | आज नवरात्रीचा तिसरा दिवस, जाणून घ्या देवी चंद्रघंटाची कथा
Shardiya Navratri 2021 : नवरात्रीचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या