मुंबई : देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा करण्याचा उत्सव म्हणजेच शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2021) कालपासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी देवी शैलपुत्रीची पूजा केली आणि देवी दुर्गाच्या एक रुपाची पूजा-अर्चना केली. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. यांना ज्ञानाचे प्रतीक मानलं जातं. जाणून घेऊया त्यांची कथा आणि देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी –
चित्रात्मक वर्णनानुसार, देवी ब्रह्मचारिणी हातात जपमाला धारण करतात आणि त्या पांढऱ्या रंगाची साडी परिधान करतात. या दिवशी देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीवर चमेलीचं फूल अर्पण करावं, कारण हे देवी ब्रह्मचारिणीचं आवडतं फूल आहे.
ब्रह्मचारिणीची कथा –
पौराणिक कथेनुसार, ब्रह्मचारिणी माता तिच्या पूर्व जन्मात हिमालय राजाची मुलगी म्हणून जन्माला आली. मोठ्या झाल्यावर देवीने नारदजींच्या उपदेशाने भगवान शिव शंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले. या तपश्चर्येमुळे त्यांना ब्रह्मचारिणी असे नाव पडले. त्यांनी एक हजार वर्षांपर्यंत फळे आणि फुले खाल्ली आणि फक्त जमिनीवर बसून शंभर वर्षे तपश्चर्या केली.
शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवीने कडक व्रत ठेवले. मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि उन्हाचा तीव्र त्रास सहन करावा लागला. तीन हजार वर्षे आईने बेलाच्या झाडावरुन गळून पडलेली, सुकलेली पाने खाऊन भोलेनाथची पूजा केली. नंतर आईने वाळलेली बेलाची पाने खाणेही बंद केले. या कारणास्तव त्यांचे नाव अर्पणा पडले. देवीने अनेक हजार वर्षे निर्जल आणि उपाशी राहून कठोर तप केले.
कठोर तपस्येमुळे, देवीचे शरीर पूर्णपणे कोरडे पडले. मग देवता, ऋषी -मुनींनी ब्रह्मचारिणी मातेच्या तपश्चर्याचे कौतुक करत सांगितले की, हे आई, जगात अशी कठोर तपश्चर्या कोणीही करु शकत नाही. अशी तपश्चर्या फक्त तुम्हीच करु शकता. तुमच्या या तपस्येमुळे तुम्हाला भोलेनाथ नक्कीच पतीच्या रुपात प्राप्त होतील. हे ऐकून ब्रह्मचारीणीने तपश्चर्या करणे थांबवले आणि त्या पुन्हा वडिलांच्या घरी परतल्या. तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी देवीला शिवशंकर पती म्हणून प्राप्त झाले.
देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी?
1. सकाळी लवकर उठून स्नान करावं.
2. त्यानंतर फूल, रोली, चंदन आणि इतर पूजा सामुग्री घ्यावी आणि देवी ब्रह्मचारिणीच्या मूर्तीला अर्पण करावं.
3. त्यानंतर देवीच्या मंत्रांचा जप करावा आणि आरती करावी.
कुठल्या मंत्राचा जप करावा –
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारी रूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||
दधाना कर पद्मभ्यम् अक्षमाला कमंडलु |
देवी प्रसीदतु मां ब्रह्मचारिण्यनुत्तमा ||ओम देवी शैलपुत्रायै नमः
या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता ||
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||
आरती :
जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी
तुमको निशदिन ध्यावत, हरि ब्रम्हा शिवरी
ओम जय अम्बे गौरी
मांग सिंदूर विराजत, टिको मृगमद को
उज्जवल से दो नैना, चंद्रवदन निको
ओम जय अम्बे गौरी
कनक समान कलेवर, रक्ताम्बर राजे
रक्तपुष्प गल माला, कंठन पर साजे
ओम जय अम्बे गौरी
केहरी वाहन रजत, खड़ग खप्पर धारी
सुर-नर-मुनिजन सेवत, तिनके दुखाहारी
ओम जय अम्बे गौरी
कानन कुंडल शोभित, नासाग्रे मोती
कोटिक चंद्र दिवाकर, रजत सम ज्योति
ओम जय अम्बे गौरी
शुम्भ-निशुम्भ बिदारे, महिषासुर घाती
धूम्रविलोचन नैना, निशिदिन मदमाती
ओम जय अम्बे गौरी
चंड-मुंड सन्हारे, शोणित बीज हरे
मधु-कैटभ दोऊ मारे, सुर भय दूर करे
ओम जय अम्बे गौरी
ब्राह्मणी, रुद्राणी, तुम कमला रानी
अगम निगम बखानी, तुम शिव पटरानी
ओम जय अम्बे गौरी।
चौसठ योगिनी गावत, नित्य करत भैरों
बाजत ताल मृदंगा, अरु बाजत डमरू
ओम जय अम्बे गौरी
तुम ही जग की माता, तुम ही हो भर्ता
भक्तन के दुःख हर्ता, सुख सम्पति कर्ता
ओम जय अम्बे गौरी
भुजा चार अति शोभित, वरमुद्रा धारी
मनवांछित फल पावत, सेवत नर नारी
ओम जय अम्बे गौरी
कंचन थाल विराजत, अगर कपूर बाती
श्रीमालकेतु में राजत, कोटि रतन ज्योति
ओम जय अम्बे गौरी
श्री अम्बेजी की आरती, जो कोई नर गावे
कहत शिवानंद स्वमी, सुख-संपत्ति पावे
ओम जय अम्बे गौरी
त्याशिवाय भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करुन खीर, मिठाई आणि फळ अर्पण करावे.
Shardiya Navratri 2021 | आज नवरात्रीचा पहिला दिवस, जाणून घ्या देवी शैलपुत्रीची कथाhttps://t.co/CMTRn84KlQ#MataShailputri #ShardiyaNavratri2021 #navratri2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shardiya Navratri 2021 : नवरात्रीत चुकूनही ही कामे करु नये, अन्यथा संकटं वाढू शकतात
Shardiya Navratri 2021 : आजपासून नवरात्रीला सुरुवात, उपवास ठेवण्यापूर्वी ही कामं करुन घ्या