Shardiya Navratri 2021 | आज नवरात्रीचा तिसरा दिवस, जाणून घ्या देवी चंद्रघंटाची कथा

| Updated on: Oct 09, 2021 | 12:15 PM

चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. त्यांच्याकडे दहा हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा पाचवा हात अभय मुद्रेमध्ये राहतो. देवी चंद्रघंटाची उपासना कशी करावी, मंत्र आणि कथेविषयी जाणून घेऊया

Shardiya Navratri 2021 | आज नवरात्रीचा तिसरा दिवस, जाणून घ्या देवी चंद्रघंटाची कथा
Maa-Chandraghanta
Follow us on

मुंबई : आज शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2021) तिसरा दिवस आहे. या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते (Goddess Chandraghanta). भाविक या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरुपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील तेज वाढतं. म्हणून त्यांना देवी चंद्रघंटा म्हणतात.

चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. त्यांच्याकडे दहा हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा पाचवा हात अभय मुद्रेमध्ये राहतो. देवी चंद्रघंटाची उपासना कशी करावी, मंत्र आणि कथेविषयी जाणून घेऊया –

देवी चंद्रघंटाची पूजा कशी करावी

देवी चंद्रघंटाची मूर्ती आणि फोटोला एका पाटावर ठेवा. त्यानंतर विधीवत देवीची पूजा करा. देवीला कुंकू, अक्षता, धूप, पुष्प आणि दूधापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवा. त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या आराधनेसाठी “ऊं देवी चंद्रघंटायै नम:” या मंत्राचा जप करा. तसेच, दुर्गा चालीसा आणि दुर्गा आरतीही करु शकता.

पूजेचं महत्व

देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने सुख-समृद्धी नांदते. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहातं. तसेच, वैवाहिक जीवन आणि विवाहासंबंधीत समस्या सुटतात.

देवी चंद्रघंटाची कथा –

हिंदू धर्मग्रंथांनुसार, जेव्हा देव आणि असूर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते, तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला. इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला. हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले. स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले. तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्र, चंद्र, सूर्य, वायु आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले.

देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे. मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिव शंकर खूप क्रोधित झाले. त्याच वेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली. देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या उर्जेमध्ये मिसळली.

ही ऊर्जा दहा दिशांना पसरु लागली. मग तिथे एका मुलीचा जन्म झाला. भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला. भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले. त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिले. इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला.

सूर्याने आपले तेज, तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला. मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली. तिचे विशाल रुप पाहून महिषासुर भीतीने थरथर कापत होता. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशाप्रकारे, देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या.

देवी चंद्रघंटाची आरती

जय मां चंद्रघंटा सुख धाम।
पूर्ण कीजो मेरे सभी काम।
चंद्र समान तुम शीतल दाती।चंद्र तेज किरणों में समाती।
क्रोध को शांत करने वाली।
मीठे बोल सिखाने वाली।
मन की मालक मन भाती हो।
चंद्र घंटा तुम वरदाती हो।
सुंदर भाव को लाने वाली।
हर संकट मे बचाने वाली।
हर बुधवार जो तुझे ध्याये।
श्रद्धा सहित जो विनय सुनाएं।
मूर्ति चंद्र आकार बनाएं।
सन्मुख घी की ज्योति जलाएं।
शीश झुका कहे मन की बाता।
पूर्ण आस करो जगदाता।
कांचीपुर स्थान तुम्हारा।
करनाटिका में मान तुम्हारा।
नाम तेरा रटूं महारानी।
भक्त की रक्षा करो भवानी।

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Shardiya Navratri 2021 | आज नवरात्रीचा पहिला दिवस, जाणून घ्या देवी शैलपुत्रीची कथा

Shardiya Navratri 2021 : नवरात्रीचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या