मुंबई : पूर्वजांना समर्पित श्राद्ध पक्ष सुरु झाला आहे. ते पूर्ण झाल्यानंतर, शक्ती स्वरुप दुर्गा देवीची पूजा करण्याचे दिवस सुरु होतील. अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा नऊ दिवसांचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. हा सण देशाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
या दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यासाठी कलश स्थापन केली जाते आणि घरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. यावेळी शारदीय नवरात्र 7 ऑक्टोबर रोजी गुरुवारपासून सुरु होणार आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी संपेल. दसऱ्याचा सण (Dussehra 2021) देखील याच दिवशी साजरा केला जाईल. कलश स्थापन करण्याच्या शुभ मुहूर्त जाणून घ्या.
कलश स्थापना शुभ मुहूर्त (Kalash Sthapana Shubh Muhurat)
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापन केली जाते आणि या दिवशी अखंड ज्योत लावली जाते. यानंतर, हा कलश 9 दिवसांसाठी स्थापित राहतो. शेवटच्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते. यावेळी शारदीय नवरात्रीला कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 9:33 ते सकाळी 11:31 पर्यंत असेल. यानंतर दुपारी 3:33 ते संध्याकाळी 5:05 पर्यंत शुभ मुहूर्त असेल. परंतु तुम्ही सकाळी स्थापना करणे अधिक चांगले.
शुभ मुहूर्ताचे महत्त्व समजून घ्या (Importance of Shubh Muhurat)
देवाची पूजा कोणत्याही वेळी केली जाऊ शकते, परंतु काही विशेष उपासनेत, शुभ मुहूर्त पाहिले जातात. असे मानले जाते की शुभ मुहूर्तात ग्रह आणि नक्षत्र शुभ परिणाम देण्याच्या स्थितीत असतात. अशा परिस्थितीत पूजेच्या वेळी कोणतेही काम करण्यात अडथळा येत नाही. शुभ मुहूर्तात तुम्ही ज्या इच्छेने उपासना यशस्वी मार्गाने करता तर तुम्हाला त्याचे चांगले परिणामही मिळतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. हेच कारण आहे की बहुतेक ज्योतिषी शुभ मुहूर्तात कोणतेही काम करण्याची शिफारस करतात.
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट, भाविकांविना साजरे होणार विधीhttps://t.co/GHOiNqDDPr#tuljabhavani #Maharashtra #navratrautsav
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 19, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Pitru Paksha 2021 : पितृ पक्षात या गोष्टी दान करा, पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल
Pitru Paksha 2021 : श्राद्ध पक्षात हे 7 संकेत दिसले तर समजा पूर्वजांचे आशीर्वाद मिळणार, धनलाभ होणार